शिंदे फडणवीस सरकार नपुंसक तरीही लाज वाटली नाही – अजित पवारांचा घणाघात

मुंबई, १ मे २०२३ : सर्वोच्च न्यायालयाने शिंदे फडणवीस सरकारला हे नपुंसक सरकार आहे अशी टीका एका सुनावणी मध्ये केली. याची लाज वाटत नाही का? महाराष्ट्रीयन म्हणून हा राज्याचा अपमान आहे का? अशा शब्दात प्रश्न उपस्थित करत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी राज्य सरकारवर घानागात केला.
महाविकास आघाडीची तिसरी वज्रमुठ सभा आज सायंकाळी मुंबईतील बीकेसी मैदानावर झाली. त्यावेळी अजित पवार यांनी भाषणात शिंदे प्रमुख सरकारवर जोरदार हल्लाबोल केला.
राज्याचे विरोधी पक्षनेते व राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अजित पवार यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या चुकांचा पाढा वाचत जोरदार खरडपट्टी काढली. मुख्यमंत्री देशाचे पंतप्रधान द्रौपदी मुर्मू म्हणतात असं सांगत त्यांनी एकनाथ शिंदेंना द्रौपदी मुर्मू पंतप्रधान आहेत की राष्ट्रपती हेही माहिती नसल्याचा मुद्दा उपस्थित केला. याशिवायही शिंदेंकडून झालेल्या चुकांची यादीच अजित पवारांनी वाचली. ते सोमवारी (१ मे) मुंबईतील बीकेसी मैदानात आयोजित वज्रमुठ सभेत बोलत होते.

अजित पवार म्हणाले, “सर्वोच्च न्यायालयाने या शिंदे-फडणवीस सरकारला नपूंसक म्हटलं. सर्वोच्च न्यायालयाने देशातील इतर कोणत्या राज्य सरकारला नपुंसक म्हटलं. याचीही यांना जनाची नाही, मनाची लाज वाटत नाही. राज्यात प्रक्षोभक भाषणं होत असताना, दंगली माजवण्याचा प्रयत्न होत असताना ते थांबवण्याची ताकद ज्या सरकारमध्ये नाही ते नपुंसक सरकार आहे अशी खरडपट्टी सर्वोच्च न्यायालयाने काढली. हा महाराष्ट्राचा अपमान नाही का? हा महाराष्ट्राचा कमीपणा नाही का?”

“आपण शेवटी सर्वजण महाराष्ट्रीयन आहोत. आपलीही अशा गोष्टींमुळे शरमेने मान खाली जाते. परंतू नैतिकदृष्ट्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना याबद्दल काही वाटत नाही. मुख्यमंत्री अलीकडे अनेकदा चुकलेले मी पाहिलं आहे, तुम्हीही पाहिलं असेल. मागे म्हणाले की, देशाचे पंतप्रधान द्रौपदी मुर्मू. आता द्रौपदी मुर्मू देशाच्या पंतप्रधान आहेत की राष्ट्रपती हेही माहिती नाही आणि मुख्यमंत्री बोलत आहेत,” अशी टीका अजित पवारांनी एकनाथ शिंदेंवर केली.

 

विश्वासहार्य राजकीय बातम्यांसाठी ज्वाईन करा “सरकार खबर” ग्रुप