पुणे: कार्यकर्त्याने ग्राउंड इंटेलिजन्स संदर्भात प्रश्न करतातच, शशी थरूर यांची बोलती बंद

पुणे, ५ मे २०२४: पंतप्रधान मोदींसह भाजपचे वरिष्ठ नेते महाराष्ट्रात अनेक सभा घेत आहे. त्या तुलनेत राहुल गांधींसह कॉंग्रेसच्या नेत्यांच्या सभा कमी दिसतात. पक्षाकडे ‘ग्राउंड इंटेलिजन्स’ कमी पडत असून, कॉंग्रेस म्हणून आपण काय करतोय, असा थेट प्रश्न एका कॉंग्रेस कार्यकर्त्याने थरूर यांना विचारला. काही वेळ सर्वच निरुत्तर झाले होते. मोदींचा प्रभाव कमी झाल्याने त्यांना जास्त सभा घ्याव्या लागतात. कॉंग्रेसच्या नेत्यांची माध्यमे दखल घेत नसल्याचे म्हणत नेत्यांकडून वेळ मारून नेण्यात आली. विशेष म्हणजे या प्रश्नाला उपस्थितांनी टाळ्यांच्या माध्यमातून दाद दिली.

अमेरिका आणि युरोपातील माध्यमांनी मोदी सरकारबद्दल नकारात्मक वार्तांकन केले आहे. आज चीन आपल्या सीमेवरील २६ ठाण्यांवर ठाण मांडून आहे. मालदीवमधून भारताला बाहेर पडावे लागले, पंतप्रधानांच्या कच्चाथीवू बेटा संबंधी वक्तव्यामुळे श्रीलंका नाराज आहे. नेपाळ आपल्याला डोळे दाखवत आहे. तर अनेक देशांमध्ये जाऊन भारताने हत्या घटविल्यामुळे मोदी सरकार परराष्ट्र धोरणात अपयशी ठरले आहे, असा आरोप कॉंग्रेस नेते शशी थरूर यांनी केला.

कॉंग्रेस उमेदवार रविंद्र धंगेकर यांच्या प्रचारानिमित्त आयोजित युवा संवाद कार्यक्रमात ते बोलत होते. राष्ट्रीय सुरक्षा, बेरोजगारी, शिक्षण, माध्यम स्वातंत्र्य, कौशल्य विकास, भ्रष्टाचार आदी मुद्द्यांवरून शशी थरूर यांनी मोदी सरकारवर टीका केली. मागील दोन निवडणूका ‘अच्छे दिन’ आणि राष्ट्रीय सुरक्षेच्या नावावर भाजपने जिंकल्या. आता मात्र त्यांच्याकडे कोणताच मुद्दा नाही. मोदींना आता विकासावरच बोलावे लागेल, असे मत थरूर यांनी व्यक्त केले. ते म्हणाले, ‘‘मोदींमुळे देशातील फक्त २० टक्के श्रीमंत सुखी झाले आहेत. मात्र, ८० टक्के भारतीय अजूनही दुःखी आहेत. शेतकऱ्यांचे उत्पन्न डबल करणे, युवकांना रोजगार देणे, वाढती महागाई आदी विषयांवर मोदी सरकार अपयशी ठरले आहेत. त्यामुळेच दुसऱ्या टप्प्यातील मतदाना नंतर देशाचा कल बदलत असून, लोकसभा निवडणुकीत इंडिया आघाडीला यश मिळणार आहे.’’ व्यासपीठावर यावेळी अभय छाजेड, उल्हास पवार, गोपाळ तिवारी, प्रगती आहेर, संजय बालगुडे, अक्षय जैन आदी उपस्थित होते. संग्राम खोपडे यांनी थरूर यांच्याशी संवाद साधला.

माध्यमांवर मोदींचा दबाव..
शशी थरूर यांनी माध्यमांवर मोदी सरकारचा दबाव असल्याचा आरोप केला. ते म्हणाले, ‘‘उद्योगांकडेच माध्यम संस्थांची असल्याने मोदी सरकार त्यांच्यावर दबाव टाकत आहे. सध्याची माध्यमे सरकारचीच रीघ ओढत असून, भाजपकडून माध्यमांना नियंत्रित करत आहे. आम्ही सरकारमध्ये आल्यावर माध्यमांचे स्वातंत्र्याचा आदर करण्यात येईल.’’