मुख्यमंत्री पदाची खुर्ची बुड टेकवायला नाही – एकनाथ शिंदेंवर ठाकरे यांची टीका

मुंबई, १ मे २०२३ : मिंध्यांना मला एक सांगायचं आहे की या लोकांनी लढा दिला नसता तर गद्दारी करून का होईना तुम्ही महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाला नसता. तसंच गद्दारी करुन मिळालेल्या खुर्चीचा उपयोग फक्त बुड टेकायला करु नका, महाराष्ट्रावरचा अत्याचार सहन करू नका, अशी टीका शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी वजन मोठे सभेत केली.

मुंबईतील बीकेसी मैदानावर महाविकास आघाडीचे वजन मोठे सभा आयोजित केली होती त्यावेळी प्रमुख मार्गदर्शक म्हणून उद्धव ठाकरे यांनी भाषण केले विरोधी पक्षनेते अजित पवार काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण शिवसेनेचे नेते आदित्य ठाकरे संजय राऊत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यासह इतर पदाधिकारी उपस्थित होते.
संभाजीनगर आणि नागपूर येथे झालेल्या दोन सभांना मोठा प्रतिसाद मिळाला होता. त्यानंतर आता तिसरी सभा मुंबई येथे झाली. यावेळी शिवसेने मोठ्या प्रमाणात शक्तिप्रदर्शन केले. त्यांच्या भाषणामध्ये शिंदे गटावर प्रहार करण्यात आला.
उद्धव ठाकरे म्हणाले, महाराष्ट्र दिनाच्या आणि कामगार दिनाच्या मी सगळ्यांना शुभेच्छा देतो. ६३ वर्षे झाली, मराठी माणसाने आणि महाराष्ट्राने मुंबई ही आपली राजधानी मिळवली. ही आंदण म्हणून मिळालेली राजधानी नाही ही आपण सगळ्यांनी लढा देऊन मिळवलेली राजधानी आहे असंही उद्धव ठाकरे यांनी बी.के.सी येथील वज्रमूठ सभेत सांगितलं. १ मेच्या मध्यरात्री मी हुतात्मा चौकात गेलो होतो. आम्ही पोहचलो तोपर्यंत कुणीही तिथे पोहचलेला नव्हता. आज सकाळी गेले असतील मिंधे. क्रियाकर्म म्हणून करायचं म्हणून जायचं आणि मानवंदना देऊन यायचं. गेलेच असतील जाणार कुठे?

मोरारजी देसाई नावाचा एक नरराक्षस खुर्चीवर बसला होता. त्याने गोळीबाराचे आदेश दिले होते. तेव्हा अनेक लोक मृत्यूमुखी पडले होते. हे तुम्हाला सांगायला पाहिजे कारण मुंबई कशी मिळाली तुम्हाला समजलं पाहिजे. इमारतींमध्ये अश्रूधुरांचा मारा केला होता. अनेक महिलांचे, लोकांचे हाल झाले. आपला मराठी माणूस, मराठी रणरागिणी कुणीही शरण गेलं नाही. उलट पोलिसांना सांगितलं की आम्हाला गोळ्या घाला पण मुंबई आम्ही हातातून जाऊ देणार नाही. मला मिंध्यांना सांगायचं आहे की महिलांमध्ये जी जिद्द होती ती कणभर तरी तुमच्यामध्ये घ्या. खुर्ची मिळाली आहे बुड टेकायला म्हणून वापरत बसू नका महाराष्ट्रावरचा अत्याचार सहन करू नका.

पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका करताना ठाकरे म्हणाले, कर्नाटकची निवडणूक रंगात आली आहे. आपले माननीय पंतप्रधान म्हणाले काँग्रेसने मला ९१ वेळा शिव्या दिल्या. मी त्यांना सांगू इच्छितो की शिव्या देण्याचं समर्थन मी करणार नाही. पण भोकं पडलेली तुमची टिनपाटं ही माझ्या विरोधात बोलत आहेत तेव्हा तुम्ही गप्प का? तुम्ही तुमच्या टिनपाटांना जी भोकं पडली आहेत त्यात बुचं घाला म्हणजे सगळं चांगलं होईल. जर तुम्ही गप्प बसलात तर आमचे लोक गप्प बसली. आम्हाला नुसती कानाला भोकं नाहीत. देवाने आम्हाला तोंडही दिलं आहे. तुम्ही गप्प बसला नाहीत तर आम्हीही बोलणार असंही उद्धव ठाकरेंनी ठणकावलं आहे.

बारसू या ठिकाणी मी जाणार. मला कोण अडवणार आहे? ६ मे रोजी मी आधी बारसूला जाणार त्यानंतर मी महाडच्या सभेला जाणार. माझ्या नावाचं पत्र दाखवत आहेत. पण त्या पत्रात असं कुठे लिहिलं आहे का? की पोलिसी बळाचा वापर करा, आंदोलनकर्त्यांना ठेचा आणि रिफायनरी करा असं कुठे काही लिहिलं आहे का मी? शरद पवारांच्या अंमलाखाली गेलो असं मला रोज सांगितलं गेलं. आज उदय सामंत कशासाठी का गेले होते? बारसू बारसू रोज माझ्या नावाने करुन स्वतःचं बारसं करत असाल तर पालघरमध्ये पोलीस का घुसवले? असाही प्रश्न उद्धव ठाकरेंनी विचारला आहे.

 

विश्वासहार्य राजकीय बातम्यांसाठी ज्वाईन करा “सरकार खबर” ग्रुप