राज्यात सरासरी ६१ टक्के मतदान, हातकणंगले, कोल्हापुरात सर्वाधिक, तर बारामती, सोलापूरला कमी मतदान

पुणे, ७ मे २०२४: राज्यात तिसऱ्या टप्प्यासाठी आज अकरा जागांवर मतदान पार पडले. पश्चिम महाराष्ट्र, मराठवाड्यातील, कोकणातील मतदारसंघांचा समावेश होता. यातील अनेक जागांवर अटीतटीच्या लढती आहेत. या जागांवर सरासरी ६१ टक्के मतदान झाले आहे.कोल्हापूर, हातकणंगले या दोन मतदारसंघात सर्वाधिक मतदानाची नोंद झाली आहे. तर बारामती, सोलापूर मतदारसंघात कमी मतदानाची नोंद झाली आहे.

बारामती लोकसभा मतदारसंघात सुनेत्रा पवार व सुप्रिया सुळे अशी अटीतटीची लढत झाली आहे. अजित पवार, शरद पवार यांच्यामध्ये जोरदार टीका-टिप्पणी झाली आहे. रोहित पवारांनी  अजित पवारांविरोधात अनेक तक्रार निवडणूक आयोगाकडे केल्या आहेत. त्यात अनेक मतदान केंद्रावर वाद ही झालेल्या तक्रारी आहेत. या मतदारसंघात ५६. ७ टक्के मतदान झाले आहे.

धक्कादायक! ईव्हीएम हॅकींगसाठी दानवेंना अडीच कोटी मागितले; पुण्यातून एक जण ताब्यात

कोल्हापूरमध्ये ७० टक्के पेक्षा जास्त मतदान
कोल्हापूर मतदारसंघात महाविकास आघाडीची उमेदवार छत्रपती शाहू महाराज आणि एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे संजय मंडलिक यांच्यात लढत झाली आहे. या मतदारसंघात इतर मतदारसंघापेक्षा सर्वाधिक ७०. ३५ टक्के मतदान झाले आहे. त्यापाठोपाठ तिरंगी लढत असलेल्या हातकणंगले मतदारसंघात ६७. १७टक्के मतदान झाले आहे. माढा लोकसभा मतदारसंघात महाविकास आघाडीचे धैर्यशिल मोहिते पाटील आणि भाजपचे रणजितसिंह निंबाळकरांमध्ये टफ फाईट होती. या मतदारसंघात ६२ टक्के मतदान झाले आहे.

धाराशिव, रत्नागिरी पन्नास टक्कांच्या पुढे
धाराशिव मतदारसंघात ६० टक्के मतदान झाले आहे. ५८ टक्के मतदान झाले आहे. रत्नागिरी मतदारसंघात ५९ टक्के, सातारा मतदारसंघात ६३ टक्के मतदान झाले आहे. सांगली लोकसभा मतदारसंघात तिरंगी लढत होती. काँग्रेसचे बंडखोर विशाल पाटील, भाजपचे संजयकाका पाटील, ठाकरे गटाचे चंद्रहार पाटील अशी तिरंगी लढत होईन येथे जास्त मतदान झालेले नाही. या मतदारसंघात ६१ टक्के मतदान झाले आहे. सोलापूर लोकसभा मतदारसंघात ५७.६१ टक्के मतदान झाले आहे.

आकडेवारीला उशीर
अनेक मतदारसंघातील काही केंद्रावर रात्री नऊपर्यंत मतदान सुरू होते. त्यामुळे अंतिम मतदानाचे टक्केवारी मिळण्यासाठी उशीर लागतो. महाराष्ट्रातील दोन टप्प्यातील अंतिम मतदानाची टक्केवारी मतदानानंतर दुसऱ्या दिवशी मिळाली होती.

कुठे किती मतदान ?
लातूर – ६०.१८ टक्के
सांगली – ६०.९५ टक्के
बारामती – ५६.७ टक्के
हातकणंगले – ५७.६१टक्के
कोल्हापूर – ७०.३५ टक्के
माढा – ६२.१७ टक्के
उस्मानाबाद – ६० .९१ टक्के
रायगड – ५८.१० टक्के
रत्नागिरी -सिंधुदूर्ग- ५९.२३ टक्के
सातारा – ६३.५ टक्के
सोलापूर – ५७.६१ टक्के