कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत काँग्रेसमध्येच पेटला वाद

चंद्रपुर, १ मे २०२३ : राज्यामध्ये कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीच्या निमित्ताने राजकारणात चांगलीच उलटा पालट झालेली आहे. यामध्ये अनेक मात्तबरांना धक्का बसला असून, नवीन चेहऱ्यांना संधी मिळाली आहे. तर काही ठिकाणी पारंपारिक विरोधी असलेले काँग्रेस आणि भाजप यांनी एकत्र येऊन बाजार समितीवर सत्ता काबीज केली आहे. चंद्रपूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीमध्ये भाजपचे नेते सुधीर मनगुंटीवार यांच्यासोबत एकत्र येऊन काँग्रेस नेते माजी मंत्री विजय वडेट्टीवार यांनी स्वतंत्र पॅनल उभा केले. यामध्ये काँग्रेसचे खासदार बाळू धानोरकर यांच्या पॅनलचा पराभव केला. यावेळी मात्र धानोरकर यांनी वडेट्टीवर यांनी चंद्रपूर लोकसभा निवडणूक लढवून दाखवील असे आवाहन दिले त्यामुळे या दोन नेत्यांमधील वाद समोर आला आहे.

चंद्रपूर बाजार समितीचा निकाल जाहीर झाला आहे. या निवडणुकीत १८ पैकी १२ जागांवर भाजपा आणि काँग्रेस समर्थित शेतकरी सहकार परिवर्तन पॅनलचा विजय झाला आहे. तर, काँग्रेसचे खासदार बाळू धानोरकर यांच्या शेतकरी सहकार पॅनलला अवघ्या सहा जागा मिळाल्या आहेत. त्यामुळे बाळू धानोरकर यांना मोठा धक्का बसला आहे.

बाजार समितीच्या या निवडणुकीत बाळू धानोरकर यांनी काँग्रेसचा वेगळा पॅनल उभा केला होता. तर, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवर यांनी पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या मदतीने दुसरा पॅनल उभा केलेला. त्यामुळे काँग्रेस नेत्यांमध्येच मुख्य लढत झाली होती. पण, या लढतीत बाळू धानोरकर यांच्या पॅनलचा पराभव झाला आहे.

अशातच बाळू धानोरकर यांनी विजय वडेट्टीवारांना आव्हान दिलं आहे. “विजय वडेट्टीवर आणि माझ्यात वैरत्व नाही. पण, ‘खासदाराने आपलं क्षेत्र सांभाळलं नाही’, असं वक्तव्य करणं चुकीचं आहे. खासदार सक्षम आहे. सक्षम वाटत नसेल, तर त्यांनी चंद्रपुरातून लोकसभा निवडणूक लढावावी. आम्ही ब्रम्हपुरी पाहण्यासाठी सक्षम आहे,” असं बाळू धानोरकरांनी म्हटलं आहे.

दरम्यान, चंद्रपूर जिल्ह्यातील भद्रावती कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये शिवसेनेची ( ठाकरे गट ) एकहाती सत्ता आली आहे. ठाकरे गटाचे नेते रवींद्र शिंदे यांच्या पॅनलला १८ पैकी १२ जागा मिळाल्या आहेत. तर काँग्रेस समर्थित पॅलला ६ जागांवर समाधान मानावं लागलं आहे. त्यामुळे चंद्रपूर जिल्ह्यात ठाकरे गटाकडे एकहाती सत्ता असलेली पहिली बाजार समिती आली आहे.

विश्वासहार्य राजकीय बातम्यांसाठी ज्वाईन करा “सरकार खबर” ग्रुप