शिवसेनेचे नेते उद्धव ठाकरे नाही तर एकनाथ शिंदेच; महायुती सरकारला दिलासा – राहुल नार्वेकर यांचा निर्णय

मुंबई, १० जानेवारी २०२४: शिवसेना उद्धव ठाकरेंची एकनाथ शिंदे यांची शिंदे गटाचे आमदार अपात्र होणार की ठाकरे गटाचे आमदार अपात्र होणार यावरून गेल्या वर्षभरापासून खल सुरू असताना आज यावर अखेर स्पष्टता आली. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी त्यांच्याकडे सुनावणी झाल्यानंतर त्यावरील निकालाची आज वाचन केले. प्रचंड उत्सुकता आणली गेलेली असताना नार्वेकर यांनी निकाल दिला. यामध्ये उद्धव ठाकरे गटातर्फे शिवसेनेच्या घटना दुरुस्ती नंतर त्याची योग्यवेळी निवडणूक आयोगाकडे नोंदणी करण्यात आलेली नाही. त्यामुळे आयोगाकडे जुनीच पक्षाची घटना आहे. त्यानुसार उद्धव ठाकरे हे शिवसेनेचे नेते नाहीत तर एकनाथ शिंदे आहेत. एकनाथ शिंदे यांना पक्षातून काढण्याचा अधिकार ठाकरेंना नाही, असे सांगत नार्वेकर यांनी ठाकरे गटात जबरदस्त झटका दिला तर महायुती सरकारला मात्र यामुळे मोठा दिलासा मिळाला आहे.

सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार राहुल नार्वेकर यांच्याकडे १६ आमदारांच्या अपात्रते संदर्भात सुनावणी सुरू होती. अनेक नाट्यमय घडामोडी आरोप प्रत्यारोपामध्ये ही सोनवणे सुरू असताना ३१ डिसेंबर पर्यंत निर्णय घेतल्याने त्यांच्या कारभारावर न्यायालयाने ताशे निवडले होते. त्यानंतर १० जानेवारी ही अखेरची तारीख सर्वोच्च न्यायालयाने दिली होती. त्यानुसार आज सायंकाळी साडेचार वाजता नार्वेकर यांनी निकालाचे वाचन सुरू केले.

माझ्यासमोर आलेल्या पुराव्यांनुसार आणि सर्वोच्च न्यायालयाने नमूद केलेल्या मुद्द्यांनुसार शिवसेनेत २१ जून २०२२ पासून दोन गट झाल्याचंसमोर आलं. त्यामुळे पुढील प्रश्नांवर विचार केला.
२०१८ सालचं पक्षातं नेतेपद पक्षाच्या घटनेनुसार होतं का?
पक्षप्रमुखाची इच्छा हीच पक्षाची इच्छा मान्य केली जायला हवी का..?
२०१८ मध्ये पक्षात कोणत्याही निवडणुका झाल्या नाहीत. पण मला पक्षाच्या नेतृत्वाबाबत निर्णय घ्यायचा नाही.
निवडणूक आयोगाने २२ जून २०२३ साली मला सोपवलेली शिवसेनेची घटना हीच आधारभूत मानण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
२०१८ साली शिवसेना पक्षाची निवडणूक आयोगासमोर सादर झालेलीच घटना स्वीकार करता येईल. त्यानंतर पक्षीय घटनेत करण्यात आलेले बदल निवडणूक आयोगासमोर सादर करण्यात आलेले नाहीत. त्यामुळे त्यानंतर झालेले बदल मी निर्णय घेताना ग्राह्य धरू शकत नाही. त्यामुळे निवडणूक आयोगासमोर फुटीच्या आधी सादर झालेली घटना ग्राह्य धरण्याचा विचार करण्यात आला.

विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांनी सर्वोच्च न्यायालयातील खटल्याच्या निकालपत्रातील मुद्द्यांचा संदर्भ दिला. तसेच, निवडणूक आयोगाकडे दाखल करण्यात आलेल्या शिवसेना पक्षाच्या राज्यघटनेबाबतही टिप्पणी केली.

शिवसेनेच्या राज्यघटनेचा, पक्षीय संघटने, विधिमंडळ पक्षाचा विचार करून कोण मूळ राजकीय पक्ष आहे, याचा विचार करण्यात आला. समोरआलेल्या पुराव्यांनुसार निवडणूक आयोगासमोर सादर करण्यात आलेल्या राज्यघटनेबाबत दोन्ही बाजूंमध्ये सहमती नाही. त्यामुळे संदर्भासाठी योग्य ती पक्षाची घटना घेणं हा माझ्यासमोर पर्याय होता.
पक्षप्रमुखांचा निर्णय हाच राजकीय पक्षाचा निर्णय हा ठाकरे गटाचा युक्तिवाद अमान्य.
शिवसेनेच्या घटनेनुसार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचाच गट हा खरी शिवसेना आहे, असे
अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी स्पष्ट करत महायुती सरकारला दिलासा दिला.