शिवसेना ठाणे शहराध्यक्ष केदार दिघे अडचणी, बलात्कार पीडितेला धमकावल्याप्रकरणी गुन्हा दाखल

मुम्बई, ०३/०८/२०२२: बलात्कार पीडित तरुणीला धमकावल्याप्रकरणी शिवसेना ठाणे शहराध्यक्ष केदार दिघे यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पीडित तरुणीला धमकावल्याप्रकरणी ना. म. जोशी मार्ग पोलीस ठाण्यात त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

पीडित तरुणीने तक्रार करू नये, म्हणून केदार दिघे यांनी तिला धमकावल्याचा आरोप तरूणीने केला आहे. याप्रकरणी ना. म. जोशी मार्ग पोलिसांनी मुख्य आरोपी रोहित कपूर याच्यासह केदार दिघे यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी दिघे यांच्यावर भारतीय दंड संहितेच्या कलम ५०६ (गुन्हेगारी धमकी) तर मित्र रोहित कपूर याच्याविरोधात कलम ३७६ नुसार बलात्काराचा गुन्हा दाखल केला आहे.

 

तक्रारदार तरुणीनं गुन्हा दाखल करण्यासाठी सोमवारी पोलिसांशी संपर्क साधला होता. त्यानंतर हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.