पुणे: मराठा मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी महामार्ग अडवून नवले पुलाजवळ टायर जाळले

पुणे, ३१ ऑक्टोबर २०२३: वडगाव पुलाजवळ मराठा क्रांती मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी मुंबई  बंगळुरू महामार्ग  टायर  जळून रोखला  दोन तासापासून महामार्ग अडवण्यात आलेला आहे. आंदोलनकर्त्यांनी ‘एक मराठा लाख मराठा’ ,’आरक्षण आमच्या हक्काचं नाही कुणाच्या बापाचं’ इत्यादी घोषणा देत आंदोलन तीव्र करण्यात आले.

अंतरवाली सराटी येथे मनोज रंगे पाटील यांनी मराठा आरक्षणासाठी उपोषण सुरू केलेले आहे. आज या उपोषणाचा सातवा दिवस आहे. गेल्या दोन दिवसांपासून राज्यात अनेक ठिकाणी जाळपोळ व तोडफोड सुरू झालेली आहे. यामध्ये आमदारांचे, राजकीय पक्षांची कार्यालय देखील सुटू शकेल नाहीत. त्याचेच प्रसाद आज पुणे शहरांमध्ये देखील उमटण्यास सुरुवात झाली आहे.

 मागील दोन तासा पासून महामार्गावरती टायर जाळून व दोन्ही बाजूच्या वाहतूक थांबवून आंदोलन सुरू आहे .जवळपास पाच पाच किलोमीटरच्या वाहनांच्या रांगा लागल्या असून मोठी वाहतूक कोंडी महामार्गावर पाहावयास मिळत आहे यावेळी पुणे पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून आंदोलन कर्त्यांना आंदोलन महामार्गावरून बाजू घेण्याची विनंती करत आहे परंतु आंदोलक आक्रमक होऊन महामार्गावरच ठिय्या मांडला आहे यामुळे पोलीस देखील हातबल झाल्याचे महामार्गावर दिसून आले आहे तसेच पुणे पोलीस दोन तीन चे डीसीपी सोहेल शर्मा हे देखील आंदोलन करताना शांततेच्या मार्गाने आंदोलन करण्यास विनंती करत आहे व आंदोलन करते देखील त्यांना त्याप्रमाणे विश्वास देताना दिसले यावेळी जवळपास हजारो कार्यकर्ते या आंदोलनामध्ये सहभागी झाल्याचे तसेच बघ यांनी देखील मोठ्या प्रमाणात गर्दी केले असून वाहतूक नियंत्रण करण्याचा अडथळा येत आहे.