फडणवीस गृहमंत्री आहेत की, गुंडांचे सागर बंगल्यावरील बॉस आहेत? राऊतांचा सवाल

पुणे, २९ जानेवारी २०२४: ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आपल्या राज्याची गृहमंत्री हे खरोखर कारवाई करायला समर्थ आहेत का? तसेच ते गृहमंत्री आहेत की सागर बंगल्यावरील बॉस आहेत. असा सवाल केला आहे. ते आज पत्रकार परिषदेमध्ये बोलत होते. त्यावेळी त्यांनी हे विधान केलं.
राऊत म्हणाले की, आपल्या राज्याचे गृहमंत्री हे खरोखर कारवाई करायला समर्थ आहेत का? तसेच ते गृहमंत्री आहेत की, सागर बंगल्यावरील बॉस आहेत. गुंडांचे बॉस हे अगोदर स्पष्ट व्हायला पाहिजे. तसेच आता गृहमंत्र्यांवरच सुनावणी व्हायला पाहिजे की, ते खरोखर गृहमंत्री आहेत की, त्यांचा एक आमदार म्हणतो. त्याप्रमाणे ते गुंडांचे सागर बंगल्यावरील बॉस आहेत.

दरम्यान भाजपा आमदार नितेश राणे यांनी वक्तव्य केलं होतं की, पोलीस आपलं काहीही वाकड करू शकत नाही. आपला बॉस सागर बंगल्यावर बसला आहे. आपण कार्यक्रम करा. तुम्हाला सुखरूप घरी पोहोचवण्याची जबाबदारी आमची. असं वादग्रस्त वक्तव्य नितेश राणे यांनी केलं. असं म्हणत नितेश राणे यांनी हिंदू कार्यकर्त्यांना एक प्रकारे चिथावणी दिली आहे. त्यामुळे आता सर्व स्तरावरून त्यांच्यावर टीकेची झोड उठत आहे.

त्यावरून आता संजय राऊतांनी देखील फडणवीसांना सवाल केला आहे. पंढरपूरमधील माळशिरस या ठिकाणी हिंदू जन आक्रोश मोर्चामध्ये नितेश राणे यांनी हे वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. यावेळी बोलताना नितेश राणे म्हणाले की, यापुढे माळशिरसमधून एकच फोन आला पाहिजे की, नितेश साहेब कार्यक्रम करून टाकला, आता पोलीस मागे लागले आहेत वाचवा. झाल्यानंतर फोन करा, विचारायला फोन करू नका. तुम्हाला सुखरूप घरी पोहोचण्याची जबाबदारी आमच्या लोकांची असेल. एवढा विश्वास मी तुम्हाला देतो. हे मी तुम्हाला पोलिसांसमोर सांगतो. कारण पोलीस आपलं काहीही वाकड करू शकत नाही. आपला बॉस सागर बंगल्यावर बसला आहे. आम्ही हिंदू सोबत उभा राहण्यासाठी आलोय कुणाच्या वाकड्यात फिरण्यासाठी नाही.