फडणवीस पुन्हा मुख्यमंत्री? भाजपच्या ट्वीटमुळे राजकारणात मोठी खळबळ

मुंबई, २७ ऑक्टोबर २०२३: उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस हे राज्याचे पुन्हा मुख्यमंत्री होतील, असे संकेत भाजपने दिले आहेत.राज्य भाजपच्या अधिकृत ट्विटर हॅंडलवरून तशा आशयाचा व्हिडिओ पोस्ट करण्यात आली आहे. नवमहाराष्ट्राच्या नवनिर्मितीसाठी मी पुन्हा येईल, असे व्हिडिओचे टायटल आहे. त्यामुळे आता राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे.

शेवटी एेवढेच सांगतो मी पुन्हा येईल, मी पुन्हा येईल. याच निर्धाराने, याच भूमिकेत, याच ठिकाणी. नवमहाराष्ट्राच्या निर्मितीसाठी. मी पुन्हा येईल, गावांना जलयुक्त करण्यासाठी, शहरांचा चेहरा बदलण्यासाठी, माझ्या महाराष्ट्राला दुष्काळमुक्त करण्यासाठी, नवमहाराष्ट्राच्या निर्मितीसाठी, असे फडणवीस यांचे व्हिडिओमध्ये बोल आहेत. फडणवीस हे २०१४ ते २०१९ मध्ये मुख्यमंत्री होते. त्यावेळचे त्यांचे विधानसभेतील हे शेवटचे भाषण होते.

राज्य भाजपने आताच हा व्हिडिओ ट्टीट करण्यामागे वेगवेगळे राजकीय अर्थ लावले जाऊ लागले आहेत. कारण दोन दिवसांपूर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे दोन दिवसांपूर्वी दिल्लीला गेले होते. त्यावेळे राज्यात सुरू असलेल्या मराठा आरक्षणाबाबत ते काही तरी निर्णय घेण्यासाठी गेले असावे, असे बोलले जात होती. या दोघांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली होती.

२०१९ मध्ये राज्यात महाविकास आघाडीचे सरकार आले होते. अडीच वर्षानंतर शिवसेनेमध्ये फूट पडली. एकनाथ शिंदे हे चाळीस आमदार घेऊन भाजपबरोबर आले. अनपेक्षितपणे एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री झाले. तर देवेंद्र फडणवीस हे उपमुख्यमंत्री झाले. सरकार स्थीर असतानाही अचानकपणे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये बंडखोरी झाली. यामध्ये अजित पवार शिंदे फडणवीस यांच्यासोबत सरकारमध्ये सहभागी झाले. त्यानंतर एकनाथ शिंदेंसह १६ आमदार अपात्र होणार असल्याने अजित पवार मुख्यमंत्री होतील अशी चर्चा सुरु होती. पण अद्याप असा निर्णय झालेला नसताना आजा भाजपने पुन्हा एकदा देवेंद्र फडणवीस यांच्या नावाची चर्चा सुरु केली आहे.