पुणे जिल्ह्यात भाजपला दुसरा धक्का; आमदार लक्ष्मण जगताप यांचं निधन

पिंपरी, ३ जानेवारी २०२३: काही दिवसांपूर्वीच कसबा मतदारसंघाच्या आमदार मुक्ता टिळक यांचं निधन झालं होतं. तो भाजपसाठी मोठा धक्का होता. मात्र, या धक्क्यातून सावरत असतानाच आता चिंचवडचे आमदार लक्ष्मण जगताप यांचं निधन झाले आहे. त्यांनी वयाच्या 59 व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्यावर गेल्या काही दिवसांपासून उपचार सुरु होते.जगताप यांची गेल्या काही दिवसांपासून कर्करोगाशी सुरु असलेली झुंज अखेर अपयशी ठरली आहे.
जगताप यांच्या निधनामुळे भाजपला दुसरा धक्का बसला आहे. जिल्ह्यातील दोन आमदारांचे एका महिन्याच्या आत निधन झाल्याने पक्षाचे मोठे नुकसान झाले आहे.

जगताप हे तीन टर्म आमदार राहिले आहेत. 2014 व 2019 मध्ये चिंचवड मतदारसंघातून भाजपच्या तिकिटावर निवड़ून आले होते.

आमदार लक्ष्मण जगताप यांनी राज्यसभा निवडणुकीवेळी भाजपसाठी अत्यंत महत्वाची भूमिका बजावली होती. भाजपच्या यांच्यासाठी प्रत्येक मत महत्त्वाचे होते. अशा परिस्थितीत लक्ष्मण जगताप आणि मुक्ता टिळक यांची मतं निश्चितच निर्णायक ठरली होती.

लक्ष्मण जगताप 2014 मध्ये भाजपमध्ये येईपर्यंत जगताप हे राष्ट्रवादीचे नेते मानले जात होते. 2014 व्यतिरिक्त, त्यांनी अपक्ष म्हणून लोकसभा निवडणूक लढवली होती. जगताप यांनी त्यांच्या 35 वर्षांच्या राजकीय कारकिर्दीत कधीही निवडणूक हरली नाही. ते प्रथम 1986 मध्ये नगरसेवक म्हणून निवडून आले आणि नंतर 2006 पर्यंत वारंवार विजयी झाले.

जगताप हे चिंचवड विधानसभा मतदारसंघाचे सलग तीन टर्म आमदार आहेत.२००९ ला ते अपक्ष म्हणून निवडून आले होते. तर, २०१४ आणि २०१९ ला भाजपकडून ते विजयी झालेले आहेत. त्यापूर्वी २००४ ला ते विधान परिषदेवर निवडून आले होते.पिंपरी-चिंचवड शहराध्यक्षपदावरून ते नुकतेच पायउतार झाले आहेत. ते शहराचे सध्याचे कारभारी आहेत. भाऊ म्हणून त्यांची ख्याती आहे. गेली ३५ वर्षे ते राजकारणात आहेत.

१९८६ ते २००६ अशी सलग वीस वर्षे पिंपरी-चिंचवड पालिकेत ते नगरसेवक होते. १९९३ ला ते स्थायी समिती अध्यक्ष, तर २००२ ला महापौर झाले. २०१४ ची लोकसभा निवडणूक ते शेतकरी कामगार पक्षाकडून लढले. मात्र, त्यात ते पराभूत झाले.शिवसेनेचे श्रीरंग बारणे यांनी त्यांचा पराभव केला. तोपर्यंत ते राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये होते. त्यानंतर २०१४ च्या विधानसभेला ते भाजपकडून निवडून आले. २०१७ ला पिंपरी पालिकेत प्रथमच भाजप सत्तेत येण्यात त्यांचा सिंहाचा वाटा आहे.