अन् राज ठाकरे एकत्र येणार; संजय शिरसाटांचं मोठं वक्तव्य

मुंबई, २९ डिसेंबर २०२३ : आगामी लोकसभा निवडणुकांसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे एकत्र येऊ शकतात तर फेब्रुवारीमध्ये त्यांची युती होऊ शकते. शिवसेनेच्या शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाठ यांनी हा मोठा दावा केला आहे. संजय शिरसाट यांनी माध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी बोलताना त्यांनी हा दावा केला आहे.

काल (२९ डिसेंबरला) एकनाथ शिंदे आणि राज ठाकरे यांची पुन्हा एकदा भेट झाली. गेल्या काही दिवसांपासून या दोन्ही नेत्यांच्या वारंवार भेटी होत आहेत. त्यामुळे हे दोन्ही नेते एकत्र येऊ शकतात. अशी शक्यता वर्तवली जात होती. त्या दरम्यानच आता शिंदे यांचे आमदार संजय शिरसाठ यांनी देखील या चर्चांना दुजोरा दिला.

शिरसाट म्हणाले की, कालच्या भेटीमध्ये कोणताही राजकीय मुद्दा नव्हता. त्यांची भेट राजकीय नव्हती. मात्र १० जानेवारीनंतर ज्या घडामोडी होतील त्यात राज ठाकरे आमच्याकडे आले तर आश्चर्य वाटायला नको. आम्ही सगळे मिळून ४५ टारगेट कंप्लीट करु. मात्र यावेळी झालेली शिंदे आणि ठाकरे यांची भेट एक सदिच्छा भेट होती. मात्र यामध्ये कोणत्याही राजकीय चर्चा झाली नाही. असं देखील शिरसाट म्हणाले आहेत.

दरम्यान आमदार अपात्रतेचा निकाल येत्या १० जानेवारीला येणार आहे. त्यानंतर राज्यात पुन्हा एकदा राजकीय भूकंप होण्याचा अंदाज वर्तवला जात आहे. त्यामध्येच राज ठाकरे आणि एकनाथ शिंदेंच्या भेटीगाठी वाढत आहेत. त्यामुळे हे दोन्ही नेते एकत्र येऊ शकतात. या चर्चांना उधान आले आहे. त्यावर आता शिरसाट यांनी देखील आपली प्रतिक्रिया दिली आहे.