“उद्धव ठाकरे फुसका फटका” – रावसाहेब दाणवेंची टीका

जालना, २६ ऑक्टोबर २०२२: केंद्रिय कोळसा कदान व रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी गावच्या निवासस्थानी दिवाळी सण साजरा केला. आज भाऊबीजेच्या दिवशी त्यांना ओवाळण्यात आले. दानवे यांच्या बहिणीच्या घरी सहकुटुंब उपस्थित राहिले होते. यावेळी त्यांना आपल्या बालपणीच्या दिवाळी सणाच्या आठवणींना उजाळा दिला. यावेळी त्यांनी एका वृत्तवाहिनीच्या प्रतिनिधीशी संवाद साधताना देशातील विविध राजकीय नेत्यांना वेगवेगळ्या फटाक्यांची उपमा दिली.

लवंगी फटाका कोण? या प्रश्नाला त्यांनी भन्नाट उत्तर दिले. दानेवे म्हणाले, आता नुसते लवंगी फटाके राहिलेत. अटॉम् बॉम्ब राहिलेच नाही. प्रत्येकाच्या खिशात लवंगी फटाके आहेत. सगळ्या राजकीय पक्षांमध्ये लवंगी फटाकेच राहिलेत. अटॉम् बॉम्ब कोणाजवळच नाही राहिला. रॉकेट आणि अटॉम् बॉम्ब फक्त आमच्याकडे म्हणजे भाजपकडे आहे.

लड कोण आहे? या प्रश्नावरही दानवेंनी हटके उत्तर दिले. लड तर आता मनसेला म्हणता येईल. एकदा ते फुटायला लागले की, थांबातच नाहीत. त्यांच्याशिवाय लड कोणाकडेही नाही. सगळे सिंगल सिंगल झालेत आता. खाकी फटाका आवाज देणारा नेता म्हणजे शरद पवार, तर फुसका फटाका कोण? यावर ते म्हणाले की, शिवसेना आणि त्यांचे शिवसेनेचे नेते म्हणजे फुसका फटाका, असा उल्लेख करत त्यांनी उद्धव ठाकरेंवर टिका केली.