“राऊतांचे नाव घेऊन माझे तोंड खराब करायला लावू नका” – उदयनराजे भोसले

दिल्ली, २० जुलै २०२० : राज्यात राजकीय उलथापालथ झाल्यानंतर केंद्र आणि स्थानिक पातळीवर देखील राजकारणाला वेगळी वळणे मिळत असून, सतत नवीन घडामोडी घडत आहे. शिवसेनेचे बंडखोर आमदार आणि शिवसेना खासदार आणि प्रवक्ते संजय राऊत यांच्यात शाब्दिक वाद सुरू असतात. अशातच भारतीय जनता पक्षाचे खासदार उदयनराजे भोसले यांनी देखील नुकतेच राऊत यांच्यावर टीका केली.

दिल्लीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतल्यानंतर ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते. यावेळी त्यांनी पत्रकारांनी विचारलेल्या विविध प्रश्नांना उत्तरे दिली. यावेळी शिवसेना पक्षचा चिन्हाबाबत खासदार भोसले म्हणाले, ” एकनाथ शिंदे यांचा गट हीच खरी शिवसेना आहे. त्यामुळे शिवसेनेचं निवडणूक चिन्ह असलेलं ‘धनुष्यबाण’ गोठावलं जाणार नाही, असं मला वाटतं. एकनाथ शिंदे हे साताऱ्याचे असून ते आमदारही नव्हते, तेव्हापासून आमची मैत्री आहे. ते एक चांगले व्यक्ती असून मुख्यमंत्री म्हणून चांगलं काम करतील, असा आत्मविश्वास मला आहे.”
“मूळ शिवसेना आम्हीच आहोत” या संजय राऊतांच्या विधानाबाबत विचारलं असता, भोसले प्रसारमाध्यमांच्या प्रतनिधींसमोर हात जोडत म्हणाले, “संजय राऊत हे देव आहेत. त्यांचं नाव माझ्यासमोर घेऊन माझं तोंड खराब करू नका.” राऊतांबाबत अन्य एक प्रश्न विचारला असता त्यांनी उत्तर देणं टाळले.