पुणे: युवासेनेतून किरण साळी यांचे हकलपट्टी

पुणे, २१ जुलै २०२२: युवा सेनेचे सहसचिव किरण साळी यांनी बंडखोरी केल्याने त्यांची युवा सेनेतून हकलपट्टी करण्यात चा निर्णय आज घेण्यात आला त्यासोबत युवा सेनेचे सचिव पूर्वेश सरनाईक यांनाही पक्षातून बाहेरचा रस्ता दाखवण्यात आलेला आहे मात्र यावर चाळी यांनी ही कार्यवाही हास्यास्पद असल्याचे सांगत या निर्णयाची थट्टा केली आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेतून बंडखोरी करत 50 आमदार सोबत घेऊन स्वतःचा वेगळा गट निर्माण केलेला आहे यानंतर आता शिवसेना व युवासेना या दोन्ही संघटनांमध्ये उघड फूट पडली आहे अनेक जिल्हाध्यक्ष व इतर पदाधिकारी शिंदे गटासोबत जात आहेत पुण्यातून देखील शिंदे गटाला मोठा पाठिंबा मिळालेला आहे या आठवड्यात अजय भोसले नाना भानगिरे यांच्यासह किरणशाळे यांनी एकनाथ शिंदे यांचा विमानतळावर स्वागत करून त्यांच्या गटामध्ये प्रवेश केला होता त्यानंतर किरण साळी यांनी युवा सेनेच्या सहसचिव पदाचा राजीनामा आदित्य ठाकरे यांच्याकडे दिला होता. मुंबईत एकनाथ शिंदे यांनी पुण्यातील पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली असता त्यामध्ये साळी यांच्याकडे शिंदे गटाच्या युवा सेनेच्या सचिव पदाची जबाबदारी देण्यात आलेली आहे.

त्यानंतर आता अधिकृत शिवसेनेकडून व युवासेनेकडून कारवाई करण्यात आलेली आहे शिंदे यांच्या गटात गेलेले युवासेना सचिव पूर्वेश सरनाईक व युवासेना सहसचिव किरण साळी यांची युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या आदेशाने युवासेनेतून हक्कलपट्टी करण्यात आली आहे, असे युवासेनेकडून स्पष्ट केले आहे.

याबाबत किरण साळी म्हणाले, “१० जुलै २०२२ रोजी मी आदित्य ठाकरे यांच्याकडे युवासेनेच्या सहसचिवपदाचा राजीनामा दिलेला आहे. आणि ज्या पदाचा आधीच राजीनामा दिलेला आहे, त्या पदाावरुन आजमितीला मला हटविण्याचा प्रश्नच उद्भवतोच कसा? त्यामुळे मला पदावरुन हटवल्याची घोषणा निव्वळ हास्यास्पदच आहे. आम्ही वंदनीय बाळासाहेबांच्या आणि वंदनीय दिघे साहेबांच्या विचारांचे पाईक आहोत. हास्यास्पद घोषणांनी आम्हाला काडीचाही फरक पडणार नाही.