मोदी आडनावावरील टीका महागात; सुरत जिल्हा न्यायालयातर्फे राहुल गांधीना २ वर्षांची शिक्षा; पुण्यात काँग्रेस नेते करणार आंदोलन  

सुरत/ पुणे, २३ मार्च २०२३ : कर्नाटकमध्ये प्रचारादरम्यान राहुल गांधींनी मोदी आडनावावरून  केलेल्या टीकेविरोधात सूरतच्या जिल्हा न्यायालयात मानहानीचा खटला दाखल करण्यात आला होता. या खटल्याची आज सुनावणी झाली असून, यामध्ये सुनावणी दरम्यान राहुल गांधींना दोषी ठरवण्यात आले व त्यांना दोन वर्षाची शिक्षा सुनावण्यात आली आहे.  राहुल गांधींनी जामीनासाठी अर्ज केला. राहुल गांधीचा जामीन मंजूर झाला आहे.  मात्र या शिक्षेची अंमलबजावणी 30 दिवसांसाठी स्थगित करण्यात आली  वरच्या कोर्टात जाण्यासाठी कोर्टाने राहुल गांधींना 30  दिवसांचा वेळ दिला आहे.

2019 साली राहुल गांधी यांनी कर्नाटकच्या कोलारमध्ये एक वादग्रस्त वक्तव्य केले होते. ‘सर्व चोरांची आडनाव मोदीच कशी असतात’, असं राहुल प्रचारसभेत म्हणाले होते. त्याविरोधात गुजरातमधील एका भाजप आमदाराने पोलिसांत तक्रार केली होती.   राहुल यांनी आपल्या वक्तव्याने संपूर्ण मोदी समाजाची प्रतिष्ठा खाली आणल्याचा त्यांचा आरोप होता. त्यावर आज सुरत सेशन्स कोर्टानं निकाल दिला आहे.

पुण्यात काँग्रेस नेते करणार आंदोलन

खासदार राहुल गांधी यांना सुरत कोर्टाने मोदी सरकारच्या आदेशानुसार ही शिक्षा सुनावली असल्याचा दावा करत, या निर्णयाविरोधात पुण्यातील कॉंग्रेस नेते आज दुपारी बालगंधर्व चौक येथे आंदोलन करणार असल्याचे पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटी अध्यक्ष अरविंद शिंदे यांनी सांगितले.

विश्वासहार्य राजकीय बातम्यांसाठी ज्वाईन करा “सरकार खबर” ग्रुप