सुषमा अंधारे यांचे हेलिकॉप्टर क्रॅश

महाड, ३ मे २०२४ : शिवसेना उद्धव बाळासाहेब शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांना घ्यायला आलेले हेलिकॉप्टर क्रॅश झाल्याची माहिती समोर येत आहे. सुषमा अंधारे आणि पायलट दोघेही सुखरूप आहेत. हेलिकॉप्टर क्रॅश होण्याचं कारण अद्याप अस्पष्ट आहे. महाडमध्ये ही घटना घडल्याची माहिती आहे. सुषमा अंधारेच्या बसण्यापूर्वीच हे हेलिकॉप्टर क्रॅश झाले.

सुषमा दगडू अंधारे या पेशानं एक वकील आहेत. राज्यशास्त्र आणि समाजशास्त्र विषयाच्या व्याख्यात्या, पुरोगामी व स्त्रीवादी अभ्यासक, भटक्या विमुक्त व आंबेडकरी चळवळीतील सामाजिक आणि राजकीय कार्यकर्त्या, वक्त्या आणि लेखिका आहेत. शिवसेना ठाकरे गटाच्या २०२२ च्या दसरा मेळाव्यानंतर त्या चर्चेत आल्या. या मेळाव्यात त्यांनी आक्रमक शैलीत भाषण केले होते. सध्या त्या लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीच्या स्टार प्रचारक आहेत.ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांना घ्यायला आलेले हेलिकॉप्टर क्रॅश झाल्याची माहिती समोर येत आहे. सुषमा अंधारे आणि पायलट दोघेही सुखरूप आहेत. हेलिकॉप्टर क्रॅश होण्याचं कारण अद्याप अस्पष्ट आहे. महाडमध्ये ही घटना घडल्याची माहिती आहे. सुषमा अंधारेच्या बसण्यापूर्वीच हे हेलिकॉप्टर क्रॅश झाले.

शिवसेनेमध्ये फूट पडल्यानंतर शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये असलेल्या सुषमा अंधारे यांनी ठाकरे गटामध्ये प्रवेश केला. त्यांच्याकडे उपनेते पदाची व प्रवक्ते पदाची जबाबदारी देण्यात आलेली आहे. सुषमा अंधारे या त्यांच्या वतकुत्वामुळे व टोलेबाजी मुळे लोकप्रिय असून ठाकरे गटाला त्यांची भूमिका मांडण्यासाठी एक महत्त्वाचा चेहरा मिळालेला आहे. लोकसभा निवडणुकीमध्ये देखील त्यांना अनेक ठिकाणावरून प्रचारासाठी मागणी होत आहे. त्यामुळे त्यांना पक्षाने स्टार प्रचारक नियुक्त करून हेलिकॅप्टर ची सेवा देखील उपलब्ध करून दिलेली आहे. मात्र आज त्यांचे हेलिकॉप्टर क्रॅश झाले हा अपघाताचा व्हिडिओ देखील सुषमा अंधारे यांच्या फेसबुक वर शेअर करण्यात आलेला आहे.