Pune: PM Modi's Accusations of Rs 70,000 Crore Corruption by NCP Met with Sharp Response from Sharad Pawar

महाराष्ट्रात भटकती आत्मा – मोदींचे शरद पवारांचे शरसंधान

पुणे, २९ एप्रिल २०२४: भटकत्या आत्म्याची काही स्वप्ने पूर्ण झाली नाहीत. त्यामुळे ते सरकार अस्थिर करण्याचे प्रयत्न करतात. ४५ वर्षांपूर्वी या खेळाला सुरूवात झाली. अगदी १९९५ साली राज्यात युतीचे सरकार आले, तेव्हाही सरकार अस्थिर करण्याचे या आत्म्याने प्रयत्न केले. विरोधकांसोबकच नाही तर स्वत:च्या पक्षात आणि घरातही असेच वर्तन करतात, अशी टीका पंतप्रधान मोदी यांनी शरद पवार यांच्यावर केली.

ज्यांची स्वप्ने पूर्ण झाली नाहीत असे काही ‘भटकते आत्मे’ आहेत. आपला महाराष्ट्र देखील याचा शिकार झालाय. आजपासून ४५ वर्षांआधी या खेळाला सुरूवात केली. १९९५ मध्ये आलेल्या युतीच्या सरकारला हाच भटकता आत्मा अस्थिर करण्याचा प्रयत्न करत होता. हा आत्मा फक्त विरोधकच नव्हे तर स्वतःचा पक्ष आणि आपल्या घरात पण असेच करतो, अशा शब्दात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नाव न घेता ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्यावर टीका केली. शरद पवार यांचे पुतणे तथा उपमुख्यमंत्री अजित पवार मंचावर असतानाच मोदींनी शरद पवार यांचा ‘भटकता आत्मा’ असा उल्लेख केल्याने भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार यांच्यात संघर्ष पेटण्याची शक्यता आहे.

मोदी म्हणाले, ज्यांची स्वप्ने पूर्ण झालेली नसतात, ते भटकते आत्मे दुसऱ्यांची स्वप्नेही पूर्ण होऊ देत नाहीत, त्यांच्यामध्ये खोडा घालण्याचे काम करतात. आजपासून ४५ वर्षांपूर्वी आपल्या राजकीय महत्त्वकांक्षेपोटी इथल्या एका बड्या नेत्याने (शरद पवार) अस्थिरतेच्या खेळाला सुरूवात केली. तेव्हापासून महाराष्ट्र अस्थिरतेच्या सावटाखाली आहे. त्यामुळे अनेक मुख्यमंत्र्यांना त्यांचा ५ वर्षांचा कार्यकाळ पूर्ण करता आला नाही. केवळ विरोधकच नव्हे तर आपल्या पक्षात आणि कुटुंबालाही अस्थिर करण्याचे प्रयत्न आत्मा करत असतो, असा घणाघाती हल्ला मोदी यांनी शरद पवार यांचे नाव न घेता चढवला.
शिवसेना भारतीय जनता पक्षाचे १९९५ साली राज्यात सरकार आले. परंतु काही दिवसांतच ते सरकार अस्थिर करण्याचे प्रयत्न या आत्म्याने सुरू केले. अगदी आत्ताही २०१९ साली राज्यातील जनतेच्या जनादेशाविरोधात जाऊन त्यांनी जनतेचा अपमान केला. सध्या केवळ महाराष्ट्रात अस्थिरता निर्माण करून हे थांबत नाहीत देशात कशी अस्थिरता निर्माण होईल, याचा प्रयत्न ते करतात”, अशी टीकाही मोदी यांनी केली.