पुण्यात मनसेचे इंजिन कमळ घेऊन धावणार अमित ठाकरे- मोहोळांची झाली भेट

पुणे, १७ एप्रिल २०२४ : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्त्वाला पाठिंबा देण्याचा निर्णय घेतल्यानंतर आता पुण्यात मनसेचे कार्यकर्ते भाजपचे उमेदवार मुरलीधर मोहोळ यांचा प्रचार करणार आहेत. यापार्श्वभूमीवर आज मनसेचे नेते अमित ठाकरे आणि मुरलीधर मोहोळ यांची मनसेच्या पुणे कार्यालयात भेट झाली.
मनसेच्या भूमिकेबद्दल मोहोळ यांनी धन्यवाद व्यक्त केले. यावेळी अमित ठाकरे यांनी मनसेची संपूर्ण पुणे शहर संघटना आपल्या प्रचारात असेल, असा विश्वास दिला.

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने घेतलेल्या भूमिकेमुळे महायुतीची ताकद नक्कीच वाढली असून शहरभर असलेले मनसेचे संघटन पुणे लोकसभेत महायुतीचे मताधिक्य वाढवण्यास मोठा हातभार मिळणार आहे असे मुरलीधर मोहोळ यांनी यावेळी सांगितले.

यावेळी मनसेचे नेते बाबू वागसकर, सरचिटणीस रणजीत शिरोळे, सरचिटणीस बाळा शेडगे, सरचिटणीस अजय शिंदे, शहराध्यक्ष साईनाथ बाबर, भाजपा प्रदेश उपाध्यक्ष राजेश पांडे, शहराध्यक्ष धीरज घाटे, हेमंत रासने आदी उपस्थित होते.