पंढरपूरमध्ये नथुरामच्या समर्थनार्थ घोषणाबाजी

पंढरपूर, २६ जानेवारी २०२४ :महात्मा गांधी यांचा मारेकरी नथुराम गोडसेच्या समर्थनार्थ पंढरपुरात काही जणांनी घोषणाबाजी केल्याचा व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल झाला आहे. स्वातंत्र्यवीर सावरकर आणि नाथूराम गोडसे हेच खरे राष्ट्रभक्त असल्याचे पोस्टर घेऊन घोषणा देण्यात आल्याचा प्रकार ऐन गणतंत्रदिनाच्या दिवशी करण्यात आला.

काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी केला. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करत त्यांनी संताप व्यक्त केला. नथुराम गोडसेच्या समर्थनार्थ घोषणा दिल्या जात असल्याचे या व्हिडिओत दिसत आहे. नथुराम गोडसेचे उदात्तीकरण कोणत्याही परिस्थितीत खपवून घेतले जाणार नाही, अशा कठोर शब्दांत त्यांनी राज्य सरकारला इशारा दिला. तसेच घोषणा देणाऱ्या या समाजकंटकांवर सरकारने कारवाई करावी, अशी मागणीही वडेट्टीवार यांनी केली.

या घटनेचा एक व्हिडिओ वडेट्टीवार यांनी त्यांच्या ‘एक्स’ सोशल मीडिया अकाउंटवर शेअर केला आहे. राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची हत्या केलेल्या नथुराम गोडसेच्या समर्थनार्थ पंढरपुरात काही समाजकंटकांनी जयजयकाराच्या घोषणा देत पोस्टरबाजी केल्याचे समोर आले आहे. या समाजकंटकांवर सरकारने कठोर कारवाई करावी. महाराष्ट्राच्या मातीत नथुरान गोडसेचे उदात्तीकरण खपवून घेतले जाणार नाही, असा इशारा त्यांनी या पोस्टमध्ये सरकारला दिला आहे.

विश्वासहार्य राजकीय बातम्यांसाठी ज्वाईन करा “सरकार खबर” ग्रुप