पुणे: नाना भानगिरे शिंदे गटाचे शहर प्रमुख, अजय भोसलेंकडे सहसंपर्कप्रमुखाचे जबाबदारी

पुणे, ता. १८/०७/२०२२: पुण्यातून शिवसेनेत बंडखोरी करणाऱ्या शिवसैनिकांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मानाचे पान दिले आहे. शिंदे यांना पाठिंबा देण्यासाठी मुंबईत शक्तिप्रदर्शन केलेल्या शिवसेनेकांचे शिंदे आणि जोरदार स्वागत केले. यावेळी माजी नगरसेवक नाना भानगिरे यांची शिंदे गटाच्या शहरप्रमुख पदी निवड केली. तर माजी नगरसेवक अजय भोसले यांची सहसंपर्कप्रमुख पदी निवड केली आहे.

एकनाथ शिंदे यांनी बंडखोरी करून स्वतंत्र एकनाथ शिंदे गट स्थापन केला. राज्यात भाजपच्या मदतीने सत्ताधिक स्थापन केलेली आहे. सुरुवातीच्या टप्प्यात एकनाथ शिंदे यांना पुण्यातून फारसा प्रतिसाद मिळाला नव्हता. मात्र आता पुण्यातील अनेक शिवसैनिक शिंदे सहभागी होत आहेत. काही दिवसांपूर्वी भानगिरे, भोसले, किरण साळी यांच्यासह काही पदाधिकाऱ्यांनी एकनाथ शिंदे यांच्या सोबत जाण्याचा निर्णय घेतला होता.

शिंदे गट मजबूत करण्यासाठी हालचाली सुरू असताना पुण्यातून आज अनेक शिवसैनिक मुंबई येथे शक्ती प्रदर्शन करत शिंदे यांना पाठिंबा दिला. वृंदावन या शासकीय निवासस्थानी एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेचे स्वागत केले. याठिकाणी झालेल्या बैठकीत भानगिरे यांची शहरप्रमुख पदी तर भोसले यांची सहसंपर्कप्रमुख पदी निवड केली. किरण साळी यांना युवा सेनेच्या सचिव पदाची जबाबदारी देण्यात आलेली आहे.

 

अजय भोसले म्हणाले, “यापूर्वी मी माझ्याकडे शिवसेनेच्या शहराच्या सहसंपर्क प्रमुख पदाची जबाबदारी होती. आता एकनाथ शिंदे यांनी पुणे शहरासह जिल्ह्याच्या सहसंपर्क प्रमुख पदाची जबाबदारी दिली याचा आनंद झाला आहे. आगामी काळात शिवसैनिकांना जास्तीत जास्त न्याय मिळवण्यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत.