लोकसभा निवडणुकीत मोदी लाट ओसरली: डॉ. कुमार सप्तर्षि

पुणे, ता. २०/०४/२०२४: लोकसभेच्या निवडणुकीत पहिल्या टप्प्यात १०२ जागांवर मतदान झाले. त्यामध्ये कोठेही मोदी लाट दिसून आलेली नाही. मोदी शहा यांच्या कामकाजाच्या पद्धतीमुळे लोक भाजपला मतदान करणार नाहीत, कांग्रेसच्या पारड्यात मत टाकतील. त्यामुळे भाजपला फक्त २०० च्या जवळपास जागा मिळतील, यंदा देशात त्रिशंकू अवस्था दिसून येईल, असे मत ज्येष्ठ समाजवादी विचारवंत डॉ. कुमार सप्तर्षि यांनी व्यक्त केले

काँग्रेस भवनात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी प्रविण वाळिंबे उपस्थित होते.

सप्तर्षी म्हणाले, ‘‘संविधान आणि लोकशाही टिकली पाहिजे. काँग्रेस चे दहा वर्षे झालेले नुकसान कशामुळे झाले याचा अभ्यास करून काँग्रेस डावीकडे झुकली आहे. इंडिया मुळे बॅलन्स झाले आहे. ४०० पार का? असे कधी झालेले नाही. कशासाठी हव्यात. यामुळे धडकी भरते. भिन्न जाती, विचारसरणी, धर्म असलेल्या देशात अशी मानसिकता आरएसएस ने तयार केली. त्यांना हिंदू राष्ट्र आणण्यासाठी त्यांनी हिंदुत्वाची व्याख्या बदलली. संविधान बदलावी लागेल. यासाठी विरोधक फोडून पक्षात घेतले जात आहेत. आजमितीला ३० टक्के बाहेरच्या पक्षातील आहेत. राजकारणाचा व्यापार करणारी मंडळी पक्षात घेतली. राज्यात हे अधिक दिसते. हे महाराष्ट्रात. अजित दादांना एक जुलै ला सांगितलं आज आलात तर मुख्यमंत्री किंवा उपमुख्यमंत्री नाहीतर येरवडा जेल मध्ये जा असे सांगतिले होते.

बाहेरच्या लोकांना सोबत घेतल्याने भाजप स्ट्रॉंग झाली नाही तर पक्षातील मूळ कार्यकर्त्यांमध्ये अस्वस्थतता आहे. मराठा समाजात उच्च व तळातील असे दोन वर्ग आहेत. उच्च वर्ग विखे यांच्या सारखे तर गरीब मराठा हा मनोज जरांगे यांच्यासोबत आहेत. त्यामुळे भाजपच्या पायाखालची जमीन सरकली आहे. एकनाथ शिंदे यांना घेऊन भाजपा स्ट्रॉंग झाली नाही, म्हणून अजित पवार यांना घेतले. तरीही स्ट्रॉंग झाले नाही म्हणून नंतर भरती झाली.
या निवडणुकीत भाजपला २०० च्या आसपास जागा मिळतील, भाजप सर्वात मोठं पक्ष असेल परंतु त्रिशंकू सरकार येईल. सत्तेसाठी कुठल्याही स्तराला जाऊ शकतील हे आपण गुजरात मधील मोदी आणि शहा यांच्या गुजरातच्या सत्तेतून पाहायला मिळते. नोटबंदी फेल झाली. जीएसटी ने महागाई वाढवली. यामुळे जनतेसाठी नेमके काय केले हा प्रश्न आहे. त्यामुळे हे लोकशाही विरोधी सरकार उलथवून टाकायची आमची भूमिका आहे, असे सप्तर्षी यांनी सांगितले.

सप्तर्षी म्हणाले, छुपी लाट आहे त्याचा परिणाम दिसून मतदानातून दिसून येईल. महाराष्ट्रात भाजपच्या मागील निवडणुकी पेक्षा १५ जागा कमी होतील. दलित आणि मुस्लिम मतांचे विभाजन करण्यासाठी एमआयएम आणि वंचित काम करत आहेत, असे दिसते. परंतु आताची निवडणूक ही वेगळी असल्याने मुस्लिम आणि दलित समाज हा इंडिया अलयांस सोबत आहेत. मोदी आणि शहा यांना बाहेर काढल्याशिवाय भाजपाई देखील मुक्त होणार नाहीत. त्यामुळे यंदा भाजपाईनी देखील भाजपला मतदान करू नये, लोकशाही टिकवण्यासाठी योगदान द्यावे.