हिंदुत्वाच्या मुद्द्यावर मुख्यमंत्री शिंदे, उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी घेतली मोहन भागवत यांची भेट

मुंबई, १ऑगस्ट २०२२ : आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एकत्रितपणे राष्ट्रीय स्वरसंघचालक मोहन भागवत यांची भेट घेतली. तब्बल पाऊण तास दोघेही भागवतंसोबत होते. यादरम्यान त्यांच्यामध्ये कोणत्या विषयावर चर्चा झाली. याबाबत सवाल उपस्थित केले जात आहे. दरम्यान याबाबत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी या पाऊण तासात काय घडलं याबाबत सांगितलं.

फडणवीस म्हणाले की, हिंदूत्व हा मुद्दा आहेच. यावेळी सरसंघचालक म्हणाले की, एकत्र येऊन काम करा. सर्वांनी मिळून काम करा. त्याशिवाय हिंदूत्व हा आमचा अजेंडा आहेच.

एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रिपदाची घोषणा करताना देवेंद्र फडणवीस यांनी आपण कोणतही पद स्वीकारणार नसल्याचं सांगितलं होतं. मात्र पक्ष श्रेष्ठींनी त्यांना उपमुख्यमंत्रिपद घेण्याचे निर्देश दिले होते. यानंतर फडवणीस नाराज असल्याची चर्चा रंगली होती. या दिवसात त्यांनी सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट घेतली होती. यावेळी देवेंद्र फडणवीस हे एकटेच होते.

यावेळीही त्यांनी भागवतांशी संवाद साधला होता. यानंतर आता मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी मिळून भागवतांची भेट घेतली. या भेटीमुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.