रामाचे मंदिर आहे तर सितेचे मंदिर का नाही ? शरद पवारांच्या प्रश्नावर भाजपची टीका

पुणे, १९ एप्रिल २०२४ : आयोध्या मध्ये प्रभू श्री रामचंद्रांचे मंदिर बांधले मग सीतामाई चे मंदिर का बांधले जात नाही असा प्रश्न ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी केला आहे मात्र यावरून भाजपने पवारांच्या पलटवार करत अयोध्येत बालरामाचे मंदिर आहे त्यामुळे तेथे शेतीची मूर्ती नाही शरद पवार स्वतःच्या सुनेला बाहेरची असे हे नव्हतात मग त्यांना सीतेचा पुळका का आला असा खोचक प्रश्न देखील भाजपने केला आहे.

शरद पवार यांनी आज सकाळी त्यांचे परंपरागत प्रतिस्पर्धी दादाराव जाधवराव यांची भेटली या भेटीदरम्यान शरद पवार यांची या विषयावर चर्चा झाली. दरम्यान शरद पवार हे पुरोगामी विचाराचे नेते असून संविधान लोकशाही वाचवणे याच्याबद्दल ते वक्तव्य करून हिंदूवादी पक्षांना लक्ष करत असतात मात्र यावेळेस पवारांनी थेट सीतामाई चे मंदिर का नाही असा प्रश्न उपस्थित केल्याने दुसऱ्याच प्रकारच्या चर्चेला सुरुवात झालेली आहे तसेच आज शरद पवार यांनी बारामती येथे मारुती मंदिरामध्ये जाऊन दर्शन घेऊन प्रचाराचा नारळ फोडलेला आहे.

शरद पवार यांच्या कशाला उत्तर देताना भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले, राम मंदिरात सीतामाईची मूर्ती का नाही? असा जावईशोध शरद पवार यांनी लावला आहे. एरवी हेच पवार मंदिराच्या प्रश्नावर नाक मुरडत आपण नास्तिक असल्याची शेखी मिरवत असतात. शरद पवारांनी उचलली जीभ आणि लावली टाळ्याला असं करण्यापूर्वी राम मंदिराची थोडी माहिती घेतली असती तर बरं झालं असतं. राम मंदिरात बालरूपातील रामलल्ला विराजमान आहेत पण पवारांना फक्त राजकारण करण्यात रस आहे.

बरं जे शरद पवार निवडणुकीसाठी घरात आलेल्या सुनेला बाहेरची म्हणून हिणवतात त्यांना आज सीतामाईंबद्दल कळवळा येणं म्हणजे ढोंगीपणाचा कळसच म्हणावा लागेल, असेही बावनकुळे म्हणाले.