“मी भारतासाठी लढतो आहे, कोणतीही किंमत मोजायला तयार” – राहुल गांधी

दिल्ली, २४ मार्च २०२३ : काँग्रेस पक्षाचे नेते व खासदार राहुल गांधी यांना मानहानी प्रकरणात सुरत जिल्हा न्यायालयाने २ वर्षांची शिक्षा सुनावली आहे. या निर्णयाबाबत काँग्रेस पक्षाच्या देशभरातील इतर नेत्यांकडून सातत्याने नाराजी व्यक्त केली जात आहे. अशातच नुकतेच राहुल गांधी यांनी ट्विटरच्या माध्यमातून पहिल्यांदाच आपली प्रतिक्रिया दिली असून, यामध्ये मी भारतासाठी लढतो आहे, कोणतीही किंमत मोजायला तयार, असल्याचे त्यांनी सांगितले.

2019 साली राहुल गांधी यांनी कर्नाटकच्या कोलारमध्ये एक वादग्रस्त वक्तव्य केले होते. ‘सर्व चोरांची आडनाव मोदीच कशी असतात’, असं राहुल प्रचारसभेत म्हणाले होते. त्याविरोधात गुजरातमधील एका भाजप आमदाराने पोलिसांत तक्रार केली होती.   राहुल यांनी आपल्या वक्तव्याने संपूर्ण मोदी समाजाची प्रतिष्ठा खाली आणल्याचा त्यांचा आरोप होता. त्यावर गुरुवारी (दि.२३) सुरत सेशन्स कोर्टाने निकाल देत, गांधी यांना २ वर्षांची शिक्षा सुनावली आहे. राहुल गांधींनी जामीनासाठी अर्ज केला. राहुल गांधीचा जामीन मंजूर झाला आहे. या शिक्षेची अंमलबजावणी 30 दिवसांसाठी स्थगित करण्यात आली वरच्या कोर्टात जाण्यासाठी कोर्टाने राहुल गांधींना 30  दिवसांचा वेळ दिला आहे.

 

विश्वासहार्य राजकीय बातम्यांसाठी ज्वाईन करा “सरकार खबर” ग्रुप