पुण्यात भारतीय जनता पक्षाच्या वतीने राहुल गांधी यांच्या विरोधात निदर्शन

पुणे, दि. २४ मार्च २०२३ : काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या आक्षेपार्ह वक्तव्यांच्या निषेधार्थ पुणे शहर भारतीय जनता पक्षाच्यावतीने शहराध्यक्ष जगदीश मुळीक यांच्या नेतृत्वाखाली गोखले स्मारक चौक (गुडलक चौक) येथे तीव्र निदर्शने करण्यात आली. याप्रसंगी राहुल गांधी यांच्या निषेधार्थ जोरदार घोषणा देण्यात आल्या.

यावेळी बोलताना जगदीश मुळीक म्हणाले, “बेताल बडबडणे, देशाचा अपमान करणे, पंतप्रधानांचा अपमान करणे हे राहुल गांधी सातत्याने करत आहेत. त्यांच्या वक्तव्यानं त्यांनी केवळ पंतप्रधानांचाच नाही तर संपूर्ण ओबीसी घटकांचा अपमान केला, यावर कारवाई होणे अपेक्षितच होते. आता स्वतः च्या चुकांचा दोषही तुम्ही दुसर्‍यांना देता, हा निव्वळ बालिशपणा आहे.”

स्वातंत्रवीर सावरकर यांच्या वर टीका करणे हाच एक कलमी कार्यक्रम राहुल गांधी यांनी राबवला आहे आपली पात्रता नसताना राष्ट्रपुरुषांवर टीका करून आपल्या तोकड्या बुद्धिमत्तेचे दर्शन राहुल गांधी यांनी केले आहे. याचा भारतीय जनता पार्टी पुणे शहराच्या वतीने जाहीर निषेध करत आहे, असेही मुळीक यांनी सांगितले.
या आंदोलनाला मुळीक यांच्या सह माजी स्थायी समिती अध्यक्ष हेमंत रासने ,सरचिटणीस गणेश घोष ,राजेश येनपुरे,दत्ता खाडे, संदीप लोणकर, दीपक नागपुरे ,यांच्यासह कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते.

विश्वासहार्य राजकीय बातम्यांसाठी ज्वाईन करा “सरकार खबर” ग्रुप