बच्चू कडूंच्या विधानमुळे सरकारचे टेंशन वाढले, या तीन इंजन सरकारमध्ये कधीही बिघाड होऊ शकतो

मुंबई, १२ जुलै २०२३ ः राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडून अजित पवार यांनी शिंदे फडणवीस सरकारमध्ये सहभागी होण्याचा निर्णय घेतला. अजित पवार यांच्यासह नऊ जणांचा मंत्री म्हणून शपतविधी झाला. पण यामुळे हे सरकार आधिक मजबूत होण्याऐवजी सरकारमधील भांडणांनी उचल खाल्ली आहे. मंत्री होऊन १० दिवस उलटून गेले तरीही अद्याप खाते वाटप होऊ शकले नाही तसेच मंत्रीमंडळाचा विस्तारही रखडला आहे. एकीकडे हे सरकार शक्तीशाली असल्याचे नेते सांगत असले तरीह आमदारांच्या वक्तव्यामुळे टेंशन वाढत आहे. प्रहार जनशक्ती पक्षाचे आमदार बच्चू कडू यांनी हे सरकार मजबूत होऊ शकत, पण त्यात कधीही बिघाड हओऊ शकते, आता काँग्रेसचे आमदारही या सरकारमध्ये सहभागी होऊ शकतात असा दावा केला आहे.

अजित पवारांसह राष्ट्रवादी काँग्रेसच्या आठ आमदारांनी शपथविधी घेऊन जवळपास दहा दिवस उलटले आहेत. १० दिवसानंतरही नवीन सरकारच्या खातेवाटपाचा तिढा अद्याप सुटला नाही. मंत्रीपदावरून तिन्ही पक्षांच्या नेत्यांकडून रस्सीखेच सुरू आहे. मंत्रीपद आणि पालकमंत्री पदावरून महायुतीच्या सरकारची गुंतागुंत वाढतच चालली आहे. हाच तिढा सोडवण्यासाठी आज अजित पवार दिल्लीला रवाना झाले आहेत.
त्यापार्श्‍वभूमीवर आमदार बच्चू कडू यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना वक्तव्य केले.
कडू म्हणाले, ‘‘महायुतीच्या सरकारच्या भवितव्याबद्दल सूचक विधान केलं आहे. राज्यात तीन इंजिनचं सरकार आहे. त्यामुळे हे सरकार मजबूतही होऊ शकतं आणि बिघाडीही होऊ शकते. तसेच काँग्रेसच्या काही आमदारांनाही सत्तेत सामील करून घेण्याचा प्रयत्न सुरू आहे. सध्या थोडा खातेवाटपाचा गोंधळ सुरू असेल, असं मला वाटतं. मी याआधी म्हटल्याप्रमाणे हे सरकार तीन इंजिनचं सरकार आहे. त्यामुळे हे सरकार मजबूतही होऊ शकते आणि तीन तिघाडा म्हणून बिघाडाही होऊ शकतं. बिघाडा होऊ नये, यासाठी बैठका सुरू असतील. म्हणून हे सरकार जेवढं मजबूत करता येईल, तेवढं मजबूत करण्याचा प्रयत्न एकनाथ शिंदे करतील.”

सध्या राज्यात खातेवाटप किंवा नवीन मंत्रीमंडळ विस्ताराची चर्चा सुरू असेल. आता अशी माहिती कानावर येत आहे की, राष्ट्रवादी काँग्रेसचा उरलेला गटही सरकारमध्ये सामील होण्याची शक्यता आहे. त्यामुळे उद्या काँग्रेसमध्येही काहीही होऊ शकतं. शिवसेना आणि राष्ट्रवादी सत्तेत सामील झालीच आहे. आता काँग्रेसच बाकी आहे, त्यांनाही सामावून घेण्याचे प्रयत्न सुरू असतील, असं मला वाटतं. त्यानंतर व्यूहरचना कशी करायची, त्यासाठी नेते दिल्लीत गेले असणार, असंही बच्चू कडू म्हणाले.

 

विश्वासहार्य राजकीय बातम्यांसाठी ज्वाईन करा “सरकार खबर” ग्रुप