जेथे पैसा तिथे पवार घराणे – सदाभाऊ खोत यांची पवारांवर टीका

सोलापूर, २ जुलै २०२३ : शरद पवार कुस्ती संघटनेचेही काही काळ अध्यक्ष होते. पण, त्यांनी कधी कुस्त्या गाजवलेल्या किंवा हिंदकेसरी पुरस्कार मिळाल्याचं, माझ्या ऐकण्यात नाही. मात्र, जिथे पैसा तिथे पवार घराणं. पैसा मिळाला की ते कशाचेही अध्यक्ष होता
अशी टीका रयत क्रांती संघटनेचे अध्यक्ष सदाभाऊ खोत यांनी शरद पवारांवर केली.

सोलापूर दौऱ्यावर असलेल्या सदाभाऊ खोत यांनी पत्रकारांशी संवाद साधला. शरद पवार यांनी फडणवीसांन वर टीका करताना मी गुगली टाकली असे वक्तव्य केले होते. त्याचा खरपूस समाचार सदाभाऊ खोत यांनी घेतला.

खोत म्हणाले, “शरद पवार पवार म्हणाले, मी गुगली टाकली. कारण, मी क्रिकेट संघटनेचा अध्यक्ष होतो. मुळात शरद पवार बेकायेशीरपणे क्रिकेट संघटनेचे अध्यक्ष झाले होते. ज्यांना फलंदाजी, गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षण करता येतं, त्याने क्रिकेट संघटनेचा अध्यक्ष असावं. पण, शरद पवारांना काहीच येत नाही, तरीही ते अध्यक्ष झाले,” असं सदाभाऊ खोत यांनी म्हटलं.
“शरद पवार कुस्ती संघटनेचेही काही काळ अध्यक्ष होते. पण, त्यांनी कधी कुस्त्या गाजवलेल्या किंवा हिंदकेसरी पुरस्कार मिळाल्याचं, माझ्या ऐकण्यात नाही. मात्र, जिथे पैसा तिथे पवार घराणं. पैसा मिळाला की ते कशाचेही अध्यक्ष होतात,” असं टीकास्र सदाभाऊ खोत यांनी सोडलं आहे.

“शरद पवारांनी गुगली टाकली नव्हती. तर, महाभारतात शकुनीमामा डाव टाकून जसे पांडवांचं राज्य हिरावून घेतो. त्याच पद्धतीने महाराष्ट्राच्या महाभारतातील शकुनीमामा म्हणजे शरद पवार आहेत. त्यांनी शकुनीमामा सारखेच सोंगाट्याचा डाव खेळला होता. आणि भाजपा शिवसेनेचं सरकार घालवलं होतं,” असा आरोप सदाभाऊ खोत यांनी शरद पवारांवर केला आहे.

 

विश्वासहार्य राजकीय बातम्यांसाठी ज्वाईन करा “सरकार खबर” ग्रुप