राष्ट्रवादीचे नऊ आमदार मंत्रिपदाची शपथ घेणार? अजितदादा युती सरकारमध्ये सामील होण्याची शक्यता!

मुंबई, २ जुलै २०२३ : राज्याच्या राजकारणात प्रचंड मोठे फळभाज्या घटना घडलेली असून भाजपचा कट्टर विरोधक म्हणून राष्ट्रवादी काँग्रेसकडे पाहिले जात असताना आज विरोधी पक्ष नेते अजित पवार यांच्यासह 30 आमदार शिंदे फडणवीस युती सरकारमध्ये सहभागी होत असल्याची घटना घडत आहे. पुढील काही मिनिटांमध्ये अजित पवार हे राजभवनामध्ये उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेणार आहेत. तर दहा राष्ट्रवादीचे नेते मंत्रीपदाची शपथ घेणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली. या घटनेमुळे राज्यात एकच खळबळ उडाली आहे तर शरद पवारांना जबरदस्त झटका बसलेला आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते व विरोधीपक्ष नेते अजित पवार यांची पक्षातील महत्त्वाच्या नेत्यांसोबत देवगिरी या बंगल्यावर राष्ट्रवादीच्या समर्थक आमदारांची बैठक पार पाडली. या बैठकीमध्ये प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी अजित पवार यांनी स्वीकार करावा अशी ठाम भूमिका काही नेत्यांनी घेतल्याची दिसली होती. या बैठकीनतंर मात्र अजित पवार हे काही आमदारांसोबत राजभवनाकडे दाखल झाले आहे.

अजित पवार हे उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार आहेत, असे सांगण्यात येत आहे. अजित पवारांना ३० आमादारांचा पाठिंबा आहे, असे सांगण्यात येत आहे. तसे पत्र ही त्यांच्याकडे असल्याचे शक्यता आहे. राष्ट्रवादीचे नऊ आमदार मंत्रिपदाची शपथ घेण्याची शक्यता आहे.

गेल्या काही काळापासून अजित पवार हे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अस्वस्थ होते. त्यांना पक्षाचे प्रमुख केले जातील अशी शक्यता असताना मात्र तेथे सुप्रिया सुळे यांची वर्णी लावण्यात आलेली आहे. त्यातच काही दिवसांपूर्वी अजित पवार यांनी मला विरोधी पक्षनेते पदाच्या जबाबदारी मुक्त करा अशी मागणी पक्षाच्या बैठकीत केलेली होती. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सर्व काही अलबेला नसल्याची माहिती समोर येत असताना अजित पवार यांनी गेल्या दोन दिवसांपासून दिल्लीमध्ये भाजप नेत्यांची भेट घेतली. त्यांचे सर्व कार्यक्रम रद्द करण्यात आलेले होते. आज सकाळी अजित पवार हे मुंबईत बैठक घ्या असल्याने त्यांच्या गटातील आमदारांना मुंबई बोलण्यात आलेले होते. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये एवढी मोठी खळबळ सुरू असताना यापासून सुप्रिया सुळे आणि शरद पवार हे अनभिज्ञ असल्याचे दाखविण्यात आले. अखेर आज सकाळी आमदारांची बैठक झाल्यानंतर अजित पवार यांनी भाजप सोबत जाण्याचा निर्णय घेतलेला आहे पुढील काही वेळात ते शपथविधी घेणार आहेत.

 

विश्वासहार्य राजकीय बातम्यांसाठी ज्वाईन करा “सरकार खबर” ग्रुप