पुणे: ट्विटरवर मनसे राष्ट्रवादीत जोरदार वाद ‘तुझ्या सायबानं सुपारी घेतली, राष्ट्रवादीच्या शहराक्षांची टीका
पुणे, १६ फेब्रुवारी २०२३: चिंचवड आणि कसबा पेठ मतदारसंघासाठी होत असलेल्या पोटनिवडणुकीसाठी मनसेनं भाजपला पाठिंबा देऊन आपली भूमिका जाहीर केली आहे. मात्र, प्रचारात सहभागी होणार नाही असे जाहीर केले होते. पण आता यावरून राष्ट्रवादी काँग्रेस आणि मनसे मध्ये ट्विटरवर जोरदार खडाखंजी सुरू झालेली आहे. मनसेचे शहराध्यक्ष साईनाथ बाबर यांनी खोचक टीका राष्ट्रवादीच्या शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांच्या केल्यानंतर त्यांनीही “तुझ्या साहेबांनी सुपारी घेतली” अशी जहरी टीका केल्याने चांगली चर्चा रंगली आहे.
मनसेच्या पाठिंब्यावरुन पुण्याचं राजकारण तापायला सुरू झाली आहे. कारण कसब्यात काँग्रेसचा उमेदवार आहे. पण राष्ट्रवादीचे समर्थक प्रचारात आघाडीवर राहिले आहेत. त्यामुळे मनसेच्या साईनाथ बाबरांनी राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष प्रशांत जगतापांवर खोचक टीका केली होती. त्याला प्रशांत जगतापांनी आता उत्तर दिलंय.पुण्यातील राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप आणि मनसे शहराध्यक्ष साईनाथ बाबर यांच्यामध्ये ट्विटर वॉर सुरू आहे. बाबर यांच्या आर्वाच्च भाषेतील टीकेवर जगताप यांनी शेलक्या शब्दांत पलटवार केला. शहरातील कसबा पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर त्यांच्यात हा वाद सुरु झाला आहे.
हा वाद सुरूच असल्याचं दिसून येत आहे. मनसेचे साईनाथ बाबर प्रशांत जगतापांना उद्देशून म्हटले होते की लग्न लोकाचं अन् नाचतायत दुसरेच त्यावर आता साईनाथ बाबरांना जगतापांनी उत्तर दिलंय की बाळा शुद्धीवर ये…तुझ्या सायबानं सुपारी घेतली आहे, तू फक्त मन लावून नाचायचं काम कर.पुण्यात कसब्यासाठी मनसेकडून याआधी गणेश भोकरे इच्छूक होते. परंतु मनसेने पोटनिवडणुकीत न लढण्याचा निर्णय घेतला. राज ठाकरे यांनी कसबा आणि चिंचवड पोटनिवडणुकीत भाजपला समर्थन देणार असल्याचे जाहीर केले.
विश्वासहार्य राजकीय बातम्यांसाठी ज्वाईन करा “सरकार खबर” ग्रुप