पुणे: काँग्रेसमध्ये बंडखोरी; बाळासाहेब दाभेकरांनी भरला अर्ज
पुणे, ७ फेब्रुवारी २०२३ : कसबा विधानसभा पोट निवडणूकीमध्ये काँग्रेसमध्ये बंडखोरी झाली. जोरदार
शक्तीप्रदर्शन करत बाळासाहेब दाभेकर यांनी आज उमेदवारी अर्ज दाखल केला.
काँग्रेसने रवींद्र धंगेकर यांना उमेदवारी दिली आहे. दाभेकर काँग्रेसकडून इच्छुक होते परंतू पक्षाने उमेदवारी न दिल्याने त्यांनी उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार त्यांनी आज उमेदवारी अर्ज दाखल केला.
आज सकाळी नारायण पेठेतील मोदी गणपती मंदिरातील गणरायाच्या मूर्ती चे दर्शन घेतले त्यानंतर ते सजवलेल्या फुलांचा जीपमध्ये बसून कार्यकर्त्यांच्याबरोबर दुचाकी वाहनांच्या रॅलीत सहभागी झाले. ही रॅली नंतर केसरीवाडा येथे श्रींची दर्शन घेतले त्यानंतर शैलेश टिळक यांची सदिच्छा भेट घेतली यानंतर ही रॅली केळकर रस्त्याने आप्पा बळवंत चौक मार्गे श्रीमंत दगडूशेठ गणपती मंदिरात श्रींच्या मुर्तींची आरती केली. यानंतर रॅलीने ते शिवाजी रस्त्याने गणपती कला क्रिडा रंगमंचाच्या हालमध्ये आले
निवडणूक निर्णय अधिकारी श्रीमती देवकाते आशीष महादळकर यांच्या कडे उमेदवारी अर्ज दाखल केला.
विश्वासहार्य राजकीय बातम्यांसाठी ज्वाईन करा “सरकार खबर” ग्रुप