पुणे: काँग्रेस, राष्ट्रवादीच्या उमेदवारा विरोधात वंचित उमेदवार देण्याची शक्यता, भूमिका जाहीर करणार

पुणे, ५ फेब्रुवारी २०२३ : कसबा आणि चिंचवड विधानसभा मतदारसंघात होणाऱ्या पोटनिवडणुकीत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या दोन्ही मतदार संघात उमेदवार नाही. त्यामुळे येथे उभा राहणाऱ्या काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या उमेदवारांचा संबंध नसल्याने
या विरोधात वंचित बहुजन आघाडीचा उमेदवार येण्याची शक्यता आहे. त्यामुळे काँग्रेस आणि राष्ट्रवादीची डोकेदुखी वाढण्याची शक्यता असल्याचे समोर आले आहेत.

कसबा आणि चिंचवड मतदार संघात शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसची महाविकास आघाडी झालेली आहे. कसबा मतदारसंघ काँग्रेसकडे तर चिंचवड मतदार संघ राष्ट्रवादी काँग्रेस कडे गेला आहे. हे दोन्ही मतदारसंघ लढण्याची इच्छा शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी व्यक्त करून त्याबाबतचा प्रस्ताव उद्धव ठाकरे यांच्याकडे पाठवलेला होता. मात्र, महाविकास आघाडीच्या बैठकीत हे दोन्ही मतदारसंघ शिवसेनेकडे आलेले नाहीत. या पार्श्वभूमीवर वंचित बहुजन आघाडीने त्यांची भूमिका स्पष्ट.

गेल्याच आठवड्यात शिवसेना आणि वंचित बहुजन आघाडीची युती झालेली आहे. त्यामुळे शिवशक्ती आणि भीमशक्ती एकत्र आल्याचे ही दोन्ही पक्षाच्या नेत्यांनी सांगितले. तसेच वंचित बहुजन आघाडी ही महाविकास आघाडीचा भाग असेल असेही शिवसेनेचे प्रवक्ते संजय राऊत यांनी यापूर्वी स्पष्ट केले आहे. मात्र, आता वंचित ने घेतलेल्या भूमिकेमुळे या सर्वच पक्षांची डोकेदुखी वाढणार आहे तर भाजपला फायदा होण्याची शक्यता आहे.

वंचित बहुजन आघाडीचे प्रदेश उपाध्यक्ष तथा प्रवक्ता सिद्धार्थ मोकळे म्हणाले, वंचित बहुजन आघाडी आणि शिवसेना युती नंतर कसबा आणि चिंचवड येथे होत असलेल्या पोट निवडणुकीत शिवसेनेच्या उमेदवारांना पाठिंबा देण्याचा निर्णय झाला होता. मात्र या दोन्ही ठिकाणी शिवसेना लढत नसल्याचे दिसत आहे. महविकास आघाडी आणि वंचित बहुजन आघाडीचा अद्याप काही संबंध नसल्याने या दोन्ही जागे संदर्भात पक्षाच्या वतीने लवकरच भूमिका जाहीर करण्यात येईल.

 

विश्वासहार्य राजकीय बातम्यांसाठी ज्वाईन करा “सरकार खबर” ग्रुप