महाराष्ट्र: राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी कार्यालय फोडले, आरोपावर सुप्रिया सुळे कडाडल्या

मुंबई, ०२/०८/२०२२: ‘शिवसैनिकांनी नाही तर राष्ट्रवादीच्या कार्यकत्र्यांनी माझ्या कार्यालयाची तोडफोड केली’ असा आरोप तानाजी सावंत यांनी केला आहे. याप्रकरणी आता खासदार सुप्रिया सुळे यांनी जोरदार उत्तर दिले असून आपण पोलिस यंत्रणेकडे जावे, सरकार तुमचे आहे, महाराष्ट्राच्या पोलीस यंत्रणेवर विश्वास नसेल तर मी त्यांच्यासोबत उभी राहीन त्यांनी बिलकूल काळजी करु नये, असेही सुळे म्हणाल्या आहेत.

 

राष्ट्रवादीच्या कार्यकत्र्यांनी सेनेचे भगवे गळ्यात घालून हे काम केल्याचा आरोप कात्रज येथील शिवसेनेचे बंडखोर आमदार तानाजी सावंत याने केल्यानंतर सुप्रिया सुळेंनी त्यावर प्रतिक्रिया दिली आहे. इतकचं नाही तर सुप्रिया सुळे यांना जर तरच्या अटीवर तानाजी सावंत यांना या प्रकरणामध्ये ‘मी तुमच्याबाजूने उभी राहीन’ अशी ऑफरही दिली आहे.

 

सुळे म्हणाल्या ‘पोलिसांकडे जाऊन तक्रार करु शकतात. टीव्हीसमोर बोलण्याऐवजी पोलीस यंत्रणेकडे जावं. त्यातून कळेल. यंत्रणा त्यांच्याच हातात आहे ना? ते सरकारमध्ये आहेत ना?’ असे उलट प्रश्न सुप्रिया यांनी विचारले.