“दीड फुटाच्या आमदाराची जीभ तीन फूट” – विद्या चव्हाणांचा नितेश राणेंवर हल्लाबोल
नवी मुंबई, ७ जानेवारी २०२३: राष्ट्रवादी काँग्रेस महिला सेलचे जनजागर आंदोलन सुरू असून आज (शनिवारी) नवी मुंबईत पार पडले. या आंदोलनानंतर विद्या चव्हाण यांनी पत्रकार परिषदेत राज्यपासून केंद्रापर्यंतच्या सर्व भाजप नेत्यांवर हल्लाबोल करीत महागाई आणि बेरोजगारी वरील लक्ष हटवण्यासाठी अनावश्यक विषय घेत असल्याचा आरोप केला.
यावेळी त्यांनी दीड फुटी आमदाराची जीभ तीन फुट झाली. ते अजित पवारांवर टिका करायला लागले असे भाष्य करीत नाव न घेता नितेश राणे यांच्यावर टिका केली. उर्फी, सिनेमातील अंगप्रदर्शन, गाणी, गाण्यावेळी घातलेल्या ड्रेसचे रंग अशा विषय काढून महागाई वरील जनतेचे लक्ष विचलित केले जात आहे. असाही त्यांनी आरोप केला. यावेळी त्यांनी तुषार भोसले आणि संभाजी भिडे याचे मुळ नाव वेगळे आहे. मुळ नाव बदलून घेत लोकांची फसवेगिरी करत असल्याचा आरोप केला. तसेच ईडी माध्यमातून आम्हा सगळ्यांना जेल मध्ये टाका. पण वाढलेली महागाई दुर करा असे आवाहन केले.
देशात साडेतीन शक्ती पीठांपैकी तुळजापूरची भवानी , कोल्हापूरची महालक्ष्मी, माहूरची रेणुका आणि वणीची सप्तशृंगी असताना कामाख्या देवीचे घेत आगोरी विद्या करून तुम्ही खुर्ची मिळवली पण ती जास्त दिवस चालणार नाही. अघोरी विद्या, जादूटोणा असलेल्या कामाक्या देवीला एकनाथ शिंदे जातात. असा घणाघाती आरोप चव्हाण यांनी केला. आमचे दोनच उद्देश महागाई आणि बेरोजगारी यावर नियंत्रण मिळवा असे आवाहन चव्हाण यांनी केले. गॅस चा दर ४०० रूपये झाला पाहिजे. खायचे तेल ८० रूपये करावे अशी मागणीही यावेळी करण्यात आली.