पत्राचाळच्या आरोपावर पवार भडकलेेे? म्हणाले आधार काय?
मुंबई,२२ सप्टेंबर २०२२ : पत्राचाळ प्रकरणामध्ये शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांच्यासोबत राष्ट्रवादी अध्यक्ष शरद पवार यांनी बैठक घेतल्याचा आरोप भाजपचे आमदार अतुल भातखळकर यांनी केला होता.
पण, या आरोपाला आधार काय आहे, तो मला हवा आहे, अशी प्रतिक्रिया देऊन शरद पवार यांनी पलटवार केला आहे. पत्राचाळ प्रकरणी भाजपचे आमदार अतुल भातखळकर यांनी उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहून शरद पवार यांचा सहभाग असल्याचा आरोप केला होता. त्यानंतर शरद पवार यांनी आज पत्रकार परिषद घेऊन प्रत्युत्तर दिले आहे. ‘पत्राचाळ प्रकरणामध्ये माझ्यावर आरोप केले आहे.
कृषिमंत्री असताना संजय राऊत यांच्यासोबत बैठक घेतली होती, त्याबद्दल आधार काय आहे. तो मला हवा आहे, अशी प्रतिक्रिया ‘शरद पवार यांनी १४ ऑक्टोबर २००६ रोजी ही बैठक घेतली होती. त्याच्यामध्ये हाउसिंग संदर्भात सर्वजण उपस्थितीत होते. हा १९९८ चा प्रकल्प आहे.
तेव्हापासून टेनर हे दारोदारी फिरत आहे. शरद पवार यांना बैठक नवी नाही. शरद पवार हे मंत्री असताना त्यांनी अनेक बैठका घेतल्या आहेत. राज्यातील अनेक प्रकल्पासाठी शरद पवार हे बैठकीला हजर राहिले आहे.
दिशा देण्याचे काम शरद पवार यांनी केले, त्यांनी कोणतेही निर्णय घेतले नाही, असा जितेंद्र आव्हाड यांनी सांगितलं. तत्कालीन मुख्यमंत्री सुद्धा त्यावेळी बैठकीला होते. त्या बैठकीमध्ये सर्वांनी चर्चा केली होती. त्याबद्दल कोणताही निर्णय घेतला नव्हता, असं बैठकीच्या लेखी आढाव्यात स्पष्ट आहे. त्यामुळे पराचा कावळा करू नये, असा टोलाही जितेंद्र आव्हाड यांनी भाजपला लगावला. या प्रकरणाची चौकशी करायची असेल तर करावी, पण शरद पवार यांना बदनाम करण्याचा डाव आखला गेला आहे. राजकीय दृष्ट्या कुणालाही बदनाम करण्याचा डाव आखला गेला आहे, अशी टीकाही पवारांनी केली.
: पत्राचाळ प्रकरणामध्ये शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांच्यासोबत राष्ट्रवादी अध्यक्ष शरद पवार यांनी बैठक घेतल्याचा आरोप भाजपचे आमदार अतुल भातखळकर यांनी केला होता.