सत्तेत आल्याच्या काही दिवसात शिंदे-फडणवीस सरकारची नामांतराबाबत मोठी घोषणा

मुंबई, २५ ऑगस्ट २०२२ : नामांतराबाबत मोठी बातमी समोर आली आहे. गेल्या काही दिवसांपासून सत्ताधिकारी आणि विरोधकांमध्ये चांगलीच जुंपली आहे. काल तर विधानभवनाच्या गेटवर विरोधक आणि शिंदे गटात धक्काबुक्की झाल्याचे अनेक व्हिडीओही समोर आले आहेत. दरम्यान आज शिंदे-फडणवीस सरकारने मोठी घोषणा केली आहे.

 

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधानसभेत याची घोषणा केली. त्यामुळे उस्मानाबादचे नामांतर धाराशीव करण्यासंदर्भातील ठराव विधानसभेत मंजूर करण्यात आला आहे. तर दुसरीकडे नवी मुंबई विमानतळास दि.बा.पाटील यांच नाव देण्यात यावं, हादेखील ठराव भारत सरकारकडे पाठवण्यात आला असून हा ठराव विधानसभेत मंजूर करण्यात आला आहे. औरंगाबादचे नाव छत्रपती संभाजीनगर नामांतर करण्यासंदर्भात भारत सरकारच्या गृहविभागाला शिफारस करण्यास आली. विधानसभेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे नामांतरा संदर्भात ठराव मांडला.

तसं पाहता नामांतराची प्रक्रिया मोठी असते. मात्र आज मुख्यमंत्र्यांनी केलेली घोषणा हा महत्त्वाचा टप्पा असल्याचं म्हटलं जात आहे. औरंगाबाद शहराचे नाव संभाजीनगर आणि उस्मानाबाद शहराचे नाव धाराशिव असे नामकरण करण्याचा प्रस्ताव भारत सरकारच्या गृहमंत्रालयाकडे पाठवला.