सरकार बनवण्यात अडथळा होऊ नये म्हणून मला जेलमध्ये टाकले – संजय यांचा फडणवीसांवर आरोप

पुणे, २६ एप्रिल २०२३ : महाविकास आघाडी सरकारकडून त्या ऐवजी शिंदे फडणीसांचे सरकार आणण्यासाठी जोकर रसला होता त्यामध्ये मी अडथळा ठरलो असतो म्हणून मला जेलमध्ये टाकले होते असा आरोप उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे प्रवक्ते खासदार संजय राऊत यांनी केला.
पुण्याच्या दौंडमध्ये आयोजित जाहीर सभेमध्ये शिवसेनेच्या ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत बोलत होते.
भारतीय जनता पार्टी आणि शिवसेनेच्या शिंदे गटावर हल्लाबोल केला. हे सरकार ईडी आणि सीबीआयसारख्या संस्थांचा वापर विरोधकांचा आवाज दाबण्यासाठी करत असल्याचा पुनरुच्चार केला. यावेळी संजय राऊत यांनी त्यांना झालेल्या अटकेबद्दल वक्तव्य केलं. त्यांना झालेल्या अटकेचं कारण राऊत यांनी यावेळी सांगितंल.

संजय राऊत म्हणाले, मला तुरुंगात का टाकलं होतं हे तुम्हाला माहितीय का? मी काही केलं नव्हतं म्हणून मला तुरुंगात टाकलं. खरंतर मी माझ्या एका भावाकडून ५० लाख रुपये घरासाठी घेतले होते. ते मी परत केले. पण त्यामुळे ईडीचे लोक आले. यांचं सरकार बनत असताना हे सगळं घडलं. कारण त्यांना माहिती होतं हा माणूस सरकारविरोधात अडथळा ठरेल. मग ते लोक मला घेऊन गेले.

खासदार राऊत म्हणाले की, ते लोक मला घेऊन जात असताना मी त्यांच्या पाया पडलो नाही. मी त्यांना म्हटलं नाही की, मला घेऊन जाऊ नका, मी भारतीय जनता पक्षात प्रवेश करतो, मला सोडा, मला तुमच्या वॉशिंग मशीनमध्ये टाका, मला स्वच्छ करा, मला पवित्र करा असलं काही मी बोललो नाही. उलट मी म्हटलं चला घेऊन. परंतु तुरुंगाची भिंत मला अडवू शकली नाही.

विश्वासहार्य राजकीय बातम्यांसाठी ज्वाईन करा “सरकार खबर” ग्रुप