पवारांनी भाकरी फिरवली; लोकलेखा समितीच्या अध्ययनक्षपदासाठी रोहित पवारांचे नाव

मुंबई, २८ एप्रिल २०२३ : राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये नव्या चेहऱ्यांना संधी मिळणार असल्याची चर्चा राज्यात सुरु झाली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या युवक आघाडीच्या कार्यक्रमात बोलतना राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी भाकरी फिरवण्याची वेळ आली आहे, असे सांगितले होते. त्यानंतर पक्षातील अनेक अनुभवी आमदारांचा विचार न करता पहिल्यांदाच निवडून आलेल्या आमदार रोहित पवार यांची लोक लेखा समिती च्या अध्यक्षपदासाठी पदासाठी शिफारस करण्यात आली आहे.

राज्य विधिमंडळाच्या लोकलेखा समितीच्या अध्यक्षपदासाठी राष्ट्रवादीने रोहित पवार यांच्या नावाची शिफारस केली आहे. या समितीचे प्रमुख सहसा विरोधी पक्षाचे आमदारच असतात. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे सरकार सत्तेत येऊन नऊ महिने उलटून गेले तरीही समिती अस्तित्वात आलेली नव्हती. त्यानंतर आता सरकारने हालचाली सुरू केल्या. या समितीच्या अध्यक्षपदासाठी आमदार रोहित पवार यांचे नाव राष्ट्रवादीने सुचवल्याची माहिती मिळत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसमधील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पक्षाने लोकलेखा समितीच्या अध्यक्षपदासाठी रोहित पवार यांचे नाव सुचवले असले तरी या संदर्भात मित्र पक्षांबरोबर चर्चा करूनच अंतिम निर्णय घेण्यात येणार आहे, असे वरिष्ठ नेत्याने सांगितले आहे.
त्याच बरोबर आमदार सत्यजित तांबे हे राज्य विधानपरिषदेतून नामनिर्देशित केलेल्या पाच नेत्यांमध्ये आहेत. तांबे हे पहिल्यांदाच निवडणून आले आहेत. तांबे यांच्यासह ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे, काँग्रेसचे अभिजीत वंजारी, ठाकरे गटाचे अनिल परब, भाजपचे प्रविण दरेकर हे विधान परिषदेतून पाच नामनिर्देशित सदस्य असल्याची माहिती मिळत नाही.
लोकलेखा समिती ही राज्य विधिमंडळातील सर्वात महत्वाच्या समित्यांपैकी एक समिती आहे. या समितीत विधानसभेचे वीस आणि विधान परिषदेचे पाच सदस्य असतात. पीएसी नियंत्रक आणि महालेखा परीक्षकच्या अहवालांची छानणी ही समिती करते. या समितीचे प्रमुख सहसा विरोधी पक्षातील आमदार असतात.