लोकसभेची निवडणूक जाहीर होण्याची शक्यता प्रशासनाने दिले तयारीचे आदेश

पुणे, २७ एप्रिल २०२३ : भाजपचे ज्येष्ठ नेते तसेच खासदार गिरीश बापट यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या पुणे लोकसभा मतदारसंघात पोटनिवडणूक लवकरच जाहीर होणार आहे. मे महिन्याची निवडणूक होण्याची शक्यताही वर्तवली जात आहे. या निवडणुकीसाठी आता प्रशासनाने देखील हालचाली सुरु केल्या आहे. मतदानासाठी मतदान केंद्र सुस्थितीमध्ये आहे की नाही याची खात्री करून घ्यावी असे आदेश जिल्हा प्रशासनाकडून कर्मचाऱ्यांना देण्यात आले आहे.

खासदार गिरीश बापट यांचे निधन झाले आहे. त्यामुळे या रिक्त जागेवरची पोटनिवडणूक कधी लागणार याकडे सर्वच राजकीय पक्षांचे लक्ष लागलेले आहे. भाजपकडून मुरलीधर मोहोळ, मेधा कुलकर्णी, सिद्धार्थ शिरोळे, जगदीश मुळीक, स्वरदा बापट हे इच्छुक उमेदवार आहेत. तर राष्ट्रवादी काँग्रेसने आमच्याकडे सक्षम उमेदवार असल्याने पुणे लोकसभेची जागा आमच्याकडे द्यावी अशी मागणी काँग्रेसकडे केलेली आहे. मात्र लोकसभेची निवडणूक कधी होणार हे स्पष्टता नसल्याने राजकीय घडामोडी काहीशा मंद झालेले आहे. त्यातच आता प्रशासनाने दिलेल्या आदेशामुळे पुन्हा एकदा राजकीय चर्चांना वेग आला आहे.

शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघातील सर्व नोडल अधिकारी / पर्यवेक्षक यांना आदेशित करणेत येते की, गिरीश बापट यांचे निधनाने रिक्‍त झालेल्या जागी लोकसभा पोट निवडणूक २०२३ जाहिर होण्याची शक्‍यता आहे. यास्तव सर्व नोडल अधिकारी यांनी आपले यादी भागातील मतदान केंद्रावर तात्काळ भेट देऊन सदर मतदान केंद्राचे अक्षांश रेखांशासह फोटो काढावेत. तसेच सदर मतदान केंद्र सुस्थितीमध्ये आहेत किंवा नाही याची खात्री करावी. सदर मतदान केंद्रावर सर्व सुविधा आहेत किंवा नाही याबाबत लेखी अहवाल तात्काळ कार्यालयास सादर करावा. अशा सूचना जिल्हा प्रशासनाने कर्मचाऱ्यांना दिल्या आहेत.

गेल्या काही दिवसांपूर्वी भाजपचे ज्येष्ठ नेते तसेच खासदार गिरीश बापट यांचे दीर्घ आजाराने निधन झाले होते. बापट यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या पुणे लोकसभा मतदारसंघात पोटनिवडणूक लवकरच जाहीर होणार आहे. संभाव्य पोटनिवडणुकीसाठी सर्वच पक्षांतून इच्छुकांची बहुगर्दी आहे. परंतू, कसबा पोटनिवडणुकीप्रमाणे इथेही असेच वातावरण पाहायला मिळणार का? तसेच या निवडणुकीतही भाजप विरुद्ध मविआ अशी लढत होणार का? हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.

 

विश्वासहार्य राजकीय बातम्यांसाठी ज्वाईन करा “सरकार खबर” ग्रुप