एकनाथ शिंदे नारायण राणे यांची भेट; लोकसभेवर चर्चा

मुंबई, २२ फेब्रुवारी २०२४: लोकसभा निवडणुकीला दिवसेंदिवस रंग भरू लागले आहेत. निवडणुकीची अधिकृत घोषणा झाली नसली तरी मार्चमध्ये आचारसंहिता लागू शकते अशी शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर उमेदवार ठरवण्यावर भर दिला जात आहे. कोकणात रत्नागिरी-सिंधुदुर्ग मतदारसंघांतून केंद्रीय मंत्री नारायण राणे निवडणूक लढवतील, अशी चर्चा आहे. अशातच राणेंनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतल्याने अनेक चर्चा सुरू झाल्या आहेत.

नारायण राणे राज्यसभेवर जाणार अशी चर्चा होती. अचानक अशोक चव्हाणांनी भाजपमध्ये प्रवेश केला आणि त्यांना राज्यसभेचं तिकीट मिळालं. त्यानंतर नारायण राणे यांना रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवावी लागेल, अशी चर्चा सुरू झाली.

विशेष म्हणजे शिवसेनेकडून (शिंदे) पालकमंत्री उदय सामंत यांनी अनेक वेळा या मतदारसंघावर दावा केला आहे. त्यांच्या बंधू किरण सामंत येथून इच्छुक आहेत, तर भाजपने वर्षभरापासून या मतदारसंघावर लक्ष केंद्रित केले आहे. त्यामुळे भाजप आणि शिवसेनेकडून या मतदारसंघावर दावा केला जातोय. त्यावर गेल्या आठवड्यात भाजपचे नेते मंत्री रवींद्र चव्हाण यांनी महत्त्वाचं विधान केलं होतं. उमेदवारीच्या निर्णयावर दिल्लीतून शिक्कामोर्तब होते, असे रवींद्र चव्हाण यांनी स्पष्ट केले होते.

या पार्श्वभूमीवर नारायण राणे यांनी मुख्यमंत्री शिंदेंची भेट घेणे, याला महत्त्व प्राप्त झाले आहे. शिवसेनेने सहकार्याची भूमिका घ्यावी, अशी अपेक्षा नारायण राणेंनी व्यक्त केल्याचे समजते. कोकणात शिवसेना आणि ठाकरे गटाची चांगली ताकद आहे. शिवाय सध्या ठाकरे गटाचे विनायक राऊत खासदार आहेत. अशावेळी भाजपच्या उमेदवाराला दगाफटका होऊ नये, याची काळजी घेण्यासाठी राणेंनी मुख्यमंत्री शिंदेंची भेट घेतल्याचे बोलले जाते.

मुख्यमंत्री शिंदे आणि केंद्रीय मंत्री राणे यांच्यात सह्याद्रीवर बंद दाराआड चर्चा झाली. सध्याची राजकीय स्थिती, त्यातच महायुतीत उमेदवारावर एकमत न झाल्यास होणारे नुकसान लक्षात घेऊन ही भेट घेतल्याची चर्चा आहे.