“खोके सरकारवर उद्योजकांचा विश्वास नाही” – आदित्य ठाकरे यांची शिंदे फडणवीस यांच्यावर टीका

पुणे, २८ ऑक्टोबर २०२२: महाविकास आघाडी सरकारच्या काळात सगळ्यांनी मिळून साडे सहा लाख गुंतवणूक आणली. दावोसला महाराष्ट्राने ८० हजार गुंतवणूक आणली. शिंदे फडणवीस सरकार आल्यावर का अपयश येतय. या खोके सरकारवर उद्योजकांचा विश्वास नाही. उद्योगमंत्र्यांनी कृषी खात्यावर ट्विट केलय, कृषी मंत्री एक्साईजवर करतात. ५० खोके हे सर्वश्रुत. राज्य सरकारवर विश्वास असेल तर उद्योजक राज्यात येतील, अशी टीका युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी पत्रकार परिषदेत केली.

“आपले मुख्यमंत्री दहीहंडी, मंडळ, फोडाफोडी या व्यतिरिक्त काहीच केले नाही, अशी टीका करत आदित्य ठाकरे म्हणाले, “जगभरात वातावरण बदल यावर मोठी चर्चा सुरु आहे. सरकार मधून बाहेर पडल्यावर सुध्दा हा विषय मी बोलतोय कारण प्रत्येकाच्या जीवनाशी हा विषय निगडीत. प्रत्येक ठिकाणचे हवामान कसे असेल हे समजत नाही. ग्लोबल संस्थेसोबत काम करण यावर विचार करणे गरजेचे. आताच चर्चा झाली पुण्यात ईबसेस कशा सुरु करता येईल. पुण्यात यंदा फार पाणी तुंबले यावर आयुक्तांशी चर्चा. यातून मार्ग निघायला हवा.विकासामुळे दुसरीकडे काही परिणाम होतो आहे का? यावर संशोधन गरजेचे. दोन संस्था विकास करत असतांना समन्वय गरजेचा. यातून पाणी तुंबणे कमी होऊ शकेल. हिंदमाताला कुठेही पाणी तुंबले नाही. स्थानिक महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना सोबत घेऊन काम करावे अशी आयुक्ताकंडे विनंती केली,याबाबत आयुक्त सकारात्मक आहेत.

पायाभूत सुविधा काम होत असतांना एकत्र यावे लागेल. मी हस्तक्षेप करत नाहीए. अनेकांच्या सोबत पुण्यात चर्चा. माझी आवड आणि भिती ही शहरीकरणाची. महाराष्ट्रात साधारण ५२% शहरीकरण. पुणे, मुंबई, नागपूर यावर चर्चा होणे गरजेचे.

शेतकरी बांधवांचे नुकसान, राजकारण चालूच राहील यावर लक्ष देणे गरजेचे. चार प्रकल्प महाराष्ट्रातून निघून गेले. यांनी सांगितले एअर बस प्रकल्प आणूच. वेंदांता बद्दल जस माहिती नव्हत तसच एअर बस बद्दल त्यांना माहिती नाही. इतके दिवस ते का शांत होते? ते राज्यमंत्री राहून चुकले आहेत. देसाई साहेब उद्योगमंत्री असतांना एक समिती केलेली. जे उद्योग आहेत ते महाराष्ट्रातून जाता कामा नये. त्या समितीची बैठक घटनाबाह्य सरकारने घेतली नाही तीन महिन्यात.