भाजप विरोधात लढताना काँग्रेसला गटबाजी संपवावी लागेल पृथ्वीराज चव्हाण यांचं विधान
मुंबई, ९ जुलै २०२३ : महाराष्ट्रात सध्या राजकीय आघाडीवर जे घडत आहे, त्याविरोधात काँग्रेसने आक्रमक व्हायला पाहिजे. पण, आमच्यात आपपसात मतभेद आहेत. आधी ही गटबाची संपुष्टात आणावी लागेल, असं विधान माजी मुख्यमंत्री व काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी केलं आहे. ते
‘लोकसत्ता लोकसंवाद’ या कार्यक्रमात बोलत होते.
“राहुल गांधी यांनी वरिष्ठांना बाजूला करून तरुणांना संधी दिली. त्याचे अपेक्षित सकारात्मक परिणाम मिळाले नाहीत. कारण, जुन्यांचा अनुभव आणि नव्यांचा उत्साह एकत्र करायला पाहिजे होते. पूर्वीच्या नेत्यांनी ते केले, परंतु आता राहुल गांधी यांनी फार आक्रमकपणे तरुणांकडे नेतृत्व दिले. ते यशस्वी झाले असे म्हणता येणार नाही,” असे पृथ्वीराज चव्हाण यांनी सांगितलं.
गेल्या वर्षभरात शिवसेना आणि राष्ट्रवादीतील बंडाळीमुळे प्रादेशिक पातळीवरील दोन पक्ष कमकुवत झाले. यापुढील काळात महाराष्ट्रात द्विपक्ष पद्धत अस्तित्वात येईल. तशी राजकीय वाटचाल सुरु आहे. म्हणजेच काँग्रेस आणि भाजपा अशीच लढत होईल,” असं पृथ्वीराज चव्हाण यांनी म्हटलं.
“राष्ट्रवादीतील बंडानंतर शरद पवार आपला पक्ष काँग्रेसमध्ये विलीन करतील अशी समाजमाध्यमांमध्ये चर्चा असली तरी तशी शक्यता लगेचच दिसत नाही. शरद पवार यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला तर त्यांना संसदीय मंडळात सामावून घेतले जाऊ शकते,” असं पृथ्वीराज चव्हाण म्हणाले.
विश्वासहार्य राजकीय बातम्यांसाठी ज्वाईन करा “सरकार खबर” ग्रुप