तीन वेळा भाजपशी चर्चा, पण विचारसरणीमुळे चर्चा फिस्कटली – शरद पवार यांच्याकडून दादांचा दावा मान्य
मुंबई, ८ जुलै २०२३: राष्ट्रवादीत उभी फुट पडल्यानंतर पहिल्या जाहीर बैठकांमध्ये शरद पवार आणि अजित पवारांनी आपापल्या मनातल्या भावना व्यक्त केल्या होत्या. मात्र, या दोघांच्या भाषणात चर्चा झाली ती अजित पवारांच्या भाषणाची. भाषणादरम्यान अजितदादांनी त्यांच्या मनातली सर्व खदखद बोलून दाखवली. त्यानंतर आता शरद पवारांनी इंडिया टुडेशी बोलताना अजित पवारांच्या विधानाला दुजोरा दिला आहे. भाजपसोबत सरकारमध्ये सहभागी होण्यासाठी तीनवेळा चर्चा झाली होती, मात्र ती पुढे जाऊ शकली नाही, असा खुलासाही त्यांनी केला.
वय झालंय आता तरी तुम्ही थांबणार आहात की नाही या अजित पवारांच्या विधानावर पवारांनी यावेळी भाष्य केले. ते म्हणाले की, मी म्हातारा झालेलो नाही असे म्हणत त्यांनी अटलजींच्या वाक्याचा संदर्भ देत ‘न टायर्ड हूं, न रिटायर्ड हूं, असे सांगत जोपर्यंत पक्षाचे कार्यकर्ते त्यांना विचारत राहतील तोपर्यंत ते काम करू शकतात, असे स्पष्ट केले.
निवृत्त कधी होणार?; अजित पवारांचा थेट सवाल
अजित पवार यांनी ५ जुलै रोजी मुंबईतील वांद्रे येथे पक्षाच्या नेत्यांसोबत शक्तीप्रदर्शन केले. या बैठकीला राष्ट्रवादीचे 53 पैकी 32 आमदार उपस्थित होते. या सभेला संबोधित करताना अजित पवार यांनी काका शरद पवार यांना निवृत्तीचा सल्ला दिला होता. ते म्हणाले होते, “सरकारी अधिकारी वयाच्या 62 व्या वर्षी निवृत्त होतात. भाजपचे नेते वयाच्या 75 व्या वर्षी राजकारणातून निवृत्त होतात, तुमचे वय 83 आहे, तुम्ही थांबणार आहात की नाही. याल उत्तर देताना पवार म्हणाले की, कोणतेही मंत्रीपद न भूषवताही ते पक्षासाठी काम करत आहेत. मला निवृत्त व्हायला सांगणारे अजित पवार कोण असा सवाल करत आपण अजूनही काम करू शकतो.
हो, भाजपशी चर्चा झाली
पुढे बोलताना शरद पवारांनी भाजपच्या नेतृत्वाखालील सरकारमध्ये सहभागी होण्यासाठी आपल्या पक्षाशी 2014, 2017 आणि 2019 मध्ये चर्चा झाली होती. परंतु भिन्न विचारसरणीमुळे आम्ही पुढे गेलो नाही. प्रफुल्ल पटेल यांच्यामध्ये ही गोष्ट समजण्याचं गांभीर्य नाही, असा टोलाही शरद पवार यांनी लगावला.
विश्वासहार्य राजकीय बातम्यांसाठी ज्वाईन करा “सरकार खबर” ग्रुप