अखेर पवारांनी भाकरी फिरवली: सुप्रिया सुळे, प्रफुल्ल पटेल राष्ट्रवादीचे कार्यकारी अध्यक्ष

दिल्ली, १० जून २०२३ : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा आज पंचविसावा वर्धापन दिन साजरा केला जात असताना पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी नव्या कार्यकारणीची महत्त्वाची घोषणा केली यामध्ये खासदार सुप्रिया सुळे आणि प्रफुल्ल पटेल यांच्याकडे राष्ट्रवादीचे कार्यकारी अध्यक्ष म्हणून नवी जबाबदारी देत पक्षाचे उत्तर अधिकारी हेच असतील हे स्पष्ट केले त्याच सोबत इतर सात नेत्यांना विविध राज्यांची व सेलची जबाबदारी दिलेली आहे ही घोषणा होत असताना अजित पवार यांना मात्र कोणतेही संघटनात्मक जबाबदारी पवार यांनी दिलेली नाही.

काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पक्षाध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यामुळे मोठी खळबळ उडाली होती. त्यानंतर कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांच्या आग्रहामुळे शरद पवारांनी राजीनामा मागे घेतला, मात्र काही नेत्यांवर अतिरिक्त जबाबदारीचं वाटप करणार असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं होतं. त्यानुसार आज दिल्लीत पक्षाच्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात बोलताना शरद पवारांनी मोठ्या घोषणा केल्या आहेत.

दिल्ली येथील कार्यक्रमाला शरद पवारांनी अनेक मुद्द्यांना हात घातला व भाषणाच्या शेवटी व्या प्राधिकार्‍यांचे घोषणा केली. पवार म्हणाले, “राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील काही साथीदारांवर नव्या जबाबदाऱ्या देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार प्रफुल्ल पटेल आणि सुप्रिया सुळे यांना पक्षाच्या कार्यकारी अध्यक्षपदाची जबाबदारी सोपवत आहोत”, मला विश्वास आहे की ही पूर्ण टीम सर्व सहकाऱ्यांना उत्साह देतील, लोकांमधला विश्वास वाढवतील आणि देशातल्या परिवर्तनात राष्ट्रवादी काँग्रेसची भूमिका निभावण्यासाठी आपली कामगिरी चोखपणे बजावतील”,

नेते आणि त्यांना दिलेल्या जबाबदार्या

प्रफुल्ल पटेल – मध्य प्रदेश, गुजरात, राजस्थान, झारखंड, गोवा या राज्यांची जबाबदारी

सुप्रिया सुळे – महाराष्ट्र, हरयाणा, पंजाब, महिला, युवक-युवती आणि लोकसभा निवडणूक नियोजनाची जबाबदारी

सुनील तटकरे – ओडिशा, पश्चिम बंगाल आणि राष्ट्रीय समितीची सत्र, परिषदा, निवडणूक आयोगाच्या समस्या, शेतकऱ्यांच्या समस्या, अल्पसंख्याक विभाग या जबाबदाऱ्या

डॉ. योगानंद शास्त्री- दिल्ली सेलच्या अध्यक्षपदाची जबाबदारी

के. के. शर्मा – उत्तर प्रदेश, उत्तराखंड, हिमाचल प्रदेश, पंचायत राज विभाग

फैजल – तामिळनाडू, तेलंगणा, केरळ

नरेंद्र वानवा – सर्व पूर्वेकडची राज्ये, आयटी विभाग

जितेंद्र आव्हाड – बिहार, छत्तीसगड, जम्मू-काश्मीर, कर्नाटक, लेबर विभाग, एससी, एनटी, ओबीसी विभाग

नसीम सिद्दिकी – उत्तर प्रदेश, बिहार, गोवा

 

विश्वासहार्य राजकीय बातम्यांसाठी ज्वाईन करा “सरकार खबर” ग्रुप