शरद पवारांना जीवे मारण्याची धमकी – सुप्रिया सुळे यांची मुंबई पोलिसांकडे तक्रार

मुंबई, ९ जून २०२३ : राज्यामध्ये सत्ताधारी आणि विरोधकांकडून एकमेकांवर जोरदार चिखल फेक सुरू असताना सोशल मीडियाच्या माध्यमातून अत्यंत खालच्या दर्जाची भाषा वापरली जात आहे. त्यातच आता राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांना “तुमचा दाभोळकर करू अशा प्रकारची धमकी देत थेट ठार मारण्याचा इशारा दिला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसने गांभीर घेतली असून खासदार सुप्रिया सुळे यांनी मुंबई पोलीस आयुक्तांकडे केली आहे.

राज्यामध्ये गेल्या काही काळापासून भाजप विरुद्ध महाविकास आघाडी असा वाद दिसून येत आहे. त्यामध्ये नेत्यांकडून केली जाणारी वक्तव्य यांचे भर घालत आहेत. नेत्यांकडून पुढे जाणाऱ्या प्रक्षेपक वक्तव्यामुळे त्याची सोशल मीडियावर देखील त्याचे पडसाद उमटत आहेत. संभाजीनगर येथील मिरवणुकीमध्ये औरंगजेबाचा फोटो व्हायरल झाल्यानंतर राज्यात कोल्हापूर सह अनेक ठिकाणी दंगली झालेल्या आहेत. त्यावर शरद पवार यांनी या ठिकाणी घटना घडलीच नाही तिथे आंदोलन का केले जाते असा प्रश्न उपस्थित करत वाद्यांना टार्गेट केले. भाजपचे आमदार निलेश राणे यांनी शरद पवार यांच्यामध्ये मला कधी कधी औरंगजेब दिसतो त्यावरून राष्ट्रवादी काँग्रेस आक्रमण झालेले आहे. त्यातच आता ट्विटर वरून शरद पवारांना तुमचा दाभोलकर केला जाणार अशा शब्दात जीवे मानाचे धमकी दिलेली आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या शरद पवार यांची कन्या सुप्रिया सुळे यांनी या संदर्भात मुंबई पोलिसांची भेट घेतली आणि वादग्रस्त ट्विट करणाऱ्या वर त्वरित कारवाई करावी अशी मागणी केली आहे. प्रसारमाध्यमांशी बोलताना सुळे म्हणाल्या,”शरद पवारांना धमकी येणे हे चिंताजनक आहे. जर शरद पवारांना काही झाल्यास त्यास केंद्रीय गृहमंत्री आणि महाराष्ट्र राज्याचे गृहमंत्री जबाबदार असतील.तुम्ही आम्हाला न्याय द्यायला अशी अपेक्षा आहे.”

 

विश्वासहार्य राजकीय बातम्यांसाठी ज्वाईन करा “सरकार खबर” ग्रुप