पृथ्वीराज चव्हाणांच्या खांद्यावर बंदूक ठेवून शंभुराज देसाईंची अजित पवारांनावर टीका

कऱ्हाड, १० मे २०२३ : राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी ७० हजार कोटी रुपये खर्च करुनही एक टक्का ही सिंचन झालेले नाही, घाईगडबडीत फाईल क्लीअर केल्या की
असे वक्तव्य करत माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केले होते. त्यामुळे जनतेचे हीत, राज्याच्या तिजोरीचा पैसा योग्य प्रकारे खर्च झाला पाहिजे याचा विचार करुन आम्ही फाईलवर सह्या करतो, निर्णय घेतो, असा टोलापालकमंत्री शंभुराज देसाई यांनी विरोधी पक्षनेते अजित पवार यांना लगावला.

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतुन सरकारने शासकीय योजनांची जत्रा सुरु केली आहे. त्याचा राज्याचा प्रारंभ दौलतनगर (ता. पाटण) येथे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री व अन्य मंत्र्यांच्या उपस्थितीत शनिवारी (ता. १३) होत आहे. त्याची माहिती देण्यासाठी आयोजीत पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

देसाई म्हणाले, मुख्यमंत्री शिंदे यांनी गावी सुट्टीवर आल्यावरही ६५ फाईल प्रलंबीत न ठेवता त्या क्लीअर केल्या. शासकीय योजनांत पात्र असणारा एकही लाभार्थी या योजनेपासुन वंचीत राहु नये यासाठी ही मोहिम हाती घेतली आहे. त्यामध्ये शासनाच्या विविध विभागांच्या योजनांचा लाभ तब्बल २० ते २५ हजार लाभार्थ्यांना लाभ एकाच दिवशी देण्यात येणार आहे.शनिवारी सकाळी दहा वाजता हा कार्यक्रम होणार आहे. ते म्हणाले, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी ७० हजार कोटी रुपये खर्च करुनही एक टक्का ही सिंचन झालेले नाही असे वक्तव्य केले होते. तसे होवु नये म्हणुन आम्ही जनतेचे हीत, राज्याच्या तिजोरीचा पैसा योग्य प्रकारे खर्च झाला पाहिजे याचा विचार करुन आम्ही फाईलवर सह्या करतो, निर्णय घेतो. याची कल्पना कदाचीत अजित पवार यांना नसावी, असेही त्यांनी यावेळी सांगितले.