उद्धव ठाकरेंच्या विश्वासू सहकार्याच्या मुलाने केली गद्दारी; शिंदे गटात प्रवेश

मुंबई, १३ मार्च २०२३ : उद्धव ठाकरे यांचे अतिशय घनिष्ठ व विश्वासू सहकारी म्हणून पक्षाचे नेते सुभाष देसाई यांच्याकडे पाहिले जाते. देसाई हे ठाकरे यांच्या प्रत्येक सुखदुःखात बाळासाहेब ठाकरे यांच्यापासून सोबत उभे आहेत. आज उद्धव ठाकरे यांचा गट धोक्यात असताना देसाई कुटुंबाने देखील इतके महिने ठाकरे यांचे साथ दिली. मात्र, आता याच सुभाष देसाई यांच्या मुलाने ठाकरे यांच्याशी गद्दारी करत एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेमध्ये पक्ष प्रवेश केला.आज बाळासाहेब भवन येथे हा पक्ष प्रवेश संपन्न झाला.

आठ महिन्यांपूर्वी शिवसेनेमध्ये फूट पाडून 40 आमदार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सोबत गेले. त्यांनी भाजप सोबत हात मिळवणी करून राज्यात सत्ता स्थापन केलेली आहे. या आठ महिन्याच्या काळात शिवसेनेचे अनेक महत्त्वाचे पदाधिकारी, यांचे कुटुंबीय, खासदार शिंदे यांच्यासोबत आहेत. पण देसाई कुटुंबाने त्यांचे निष्ठा ठाकरे कुटुंबासोबत दाखवलेली होती. मात्र, आता यामध्ये फाटा फूट झालेली आहे सुभाष देसाई यांचा मुलगा भूषण देसाई यांनी आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेना प्रवेश केला.

उद्धव ठाकरे यांचे निकटवर्ती सुभाष देसाई यांच्याच मुलाने शिंदे गटात पक्ष प्रवेश केल्याने ठाकरे गटासाठी धक्का मानला जात आहे. सुभाष देसाई यांनी बाळासाहेब ठाकरे यांच्यासोबत काम केलेले आहे. २०१४ च्या भाजप-सेना युतीच्या काळात आणि महाविकास आघाडीमध्ये ते उद्योगमंत्री होते. त्यांचा विधान परिषदेतील कार्यकाल संपल्यानंतर त्यांना पुन्हा आमदारकी देण्यात आली नव्हती.

भूषण देसाई यांच्या पक्ष प्रवेशावर आदित्य ठाकरे म्हणाले की, भूषण देसाई यांचा शिवसेनेशी कोणताही संबंध नाही. कोणाला वॉशिंगमशीन मध्ये जायचे असेल तर जाऊ शकतात. सुभाष देसाई शिवसेनेशी निष्ठावान आहेत. ते २४तास पक्षासाठी आणि कार्यकर्त्यांसाठी काम करत आहेत.

 

विश्वासहार्य राजकीय बातम्यांसाठी ज्वाईन करा “सरकार खबर” ग्रुप