जॉईंट किलर धंगेकर शपथ घेताना आईचा पडू दिला नाही विसर

पुणे, ९ मार्च २०२३ : कसबा पोटनिवडणुकीत भाजपचा २८ वर्षापासून चा बालेकिल्ला उध्वस्त करत विजय मिळविणारे महाविकास आघाडीचे उमेदवार रवींद्र धंगेकर हे जॉइंट किलरस ठरले. आज त्यांनी विधिमंडळात जाऊन आमदार पदाची शपथ घेतली. यावेळी महाविकास आघाडीच्या आमदारांनी बाकडे वाजवून त्यांचे स्वागत केले. यावेळी धंगेकर यांनी त्यांच्या आईचा आवर्जून उल्लेख केला.

भाजपच्या आमदार मुक्ता टिळक यांचे निधन झाल्याने या रिक्त झालेल्या जागेवर नुकतीच पोटनिवडणूक झाली. त्यामध्ये रवींद्र धंगेकर यांनी भाजप महायुतीचे उमेदवार हेमंत रासने यांचा ११ हजार मताने मोठा पराभव केला. त्यामुळे या काँग्रेसच्या विजयाचे राज्यभरात चर्चा झाली व धंगेकर हे एक चर्चेचा विषय ठरला.

विजयी झालेले महाविकास आघाडीचे आमदार रविंद्र धंगेकर यांचा आज विधीमंडळात शपथविधी झाला. विधीमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सध्या सुरू असून नवनिर्वाचित आमदार धंगेकरांनी आज शपथ घेतली. शपथ घेताना त्यांनी आपल्या नावापुढे आपल्या आईचे नाव लावले आहे. शपथ घेताना रविंद्र धंगेकर म्हणाले की, “मी प्रथम माझ्या कसबा विधानसभा मतदारसंघातील मतदारांना नमस्कार करतो. मी रविंद्र लक्ष्मीबाई उर्फ सुलोचना हेमराज धंगेकर विधानसभेचा सदस्य म्हणून निवडून आलो असल्याने…” असा उल्लेख करत धंगेकरांनी शपथ घेतली.

दरम्यान, रविंद्र धंगेकर कसब्यातून निवडून आल्यानंतर “हू इज धंगेकर” हा चंद्रकांत पाटील यांनी प्रचाराता मारलेला डायलॉग खूप फेमल झाला होता. भाजपचे उमेदवार हेमंत रासने यांचा पराभव करून धंगेकर विजयी झाले होते. तर कसब्याची निवडणूक भाजपसाठी खूप महत्त्वाची होती. ही निवडणूक हरल्याने भाजपला मोठा धक्का बसला आहे.

विश्वासहार्य राजकीय बातम्यांसाठी ज्वाईन करा “सरकार खबर” ग्रुप