पुणे: कोश्यारी पायउतार झाल्याने राष्ट्रवादीने वाटले पेढे

पुणे, १२ फेब्रुवारी २०२३ : महापुरुषांबद्दल जाणीवपूर्वक अवमान जनक वक्तव्य करणारे वादग्रस्त राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांचा राजीनामा मंजूर करून त्यांना राज्यपाल पदावरून हटविल्याबद्दल राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीतर्फे नपर्वती येथे पेढे वाटून आनंदोत्सव साजरा केला.
राज्यपाल कोश्यारी यांनी महात्मा फुले, सावित्रीबाई ज्योतिबा फुले, छत्रपती शिवाजी महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यासह इतर महापुरुषांबद्दल वारंवार वादग्रस्त वक्तव्य केल्याने ते अडचणीत सापडले होते. संविधानात्मक पदावर बसणार्या व्यक्तीकडून असे व्यक्ती होत असल्याने त्याच्या समाजात तीव्र प्रतिक्रिया उमटत होत्या. या विरोधात कोश्यारी यांनी राजीनामा द्यावा यासाठी अनेकदा आंदोलन करण्यात आली होती. पुण्यात देखील राष्ट्रवादी काँग्रेसने अनेक वेळा आंदोलन केले होते. अखेर आज राजीनामा दिल्याने राष्ट्रवादीने पेढे वाटून या निर्णयाचे स्वागत केले.

एखाद्या राज्याचे राज्यपाल म्हणून काम पाहणाऱ्या व्यक्तीने त्या संबंधित राज्याची संस्कृती, अभिमान आदींची किमान माहिती बाळगणे गरजेचे आहे. महाराष्ट्राच्या राज्यपालांना महाराष्ट्र व मराठी माणसांच्या भावनांची अजिबात जाणिव नाही अशीच त्यांची आजवरची वागणूक पाहता दिसते. छत्रपती शिवराय, क्रांतिसूर्य महात्मा जोतिबा फुले व क्रांतिज्योती सावित्रीमाई फुले यांच्याबद्दल सातत्याने अवमानास्पद वक्तव्ये करुन त्यांनी सर्व मर्यादांचे उल्लंघन केले आहे. आज त्यांना हटविण्याचा आनंद राज्यातील सर्वच जनतेला झाला आहे तरीही सरकारला है उशिरा सुचलेले शहाणपण आहे , जर राज्यातील शिंदे फडणवीस सरकारला महापुरुषांबद्दल अस्मिता असती तर त्यांनी वेळीच राज्यपालांची हकालपट्टी केली असती आणि आजचा हा जल्लोष अधिक मोठा करता आला असता , परंतु त्यांनी तसे केले नाही.अखेर राज्यपालांनी स्वतः च निवृत्ती मागितल्यानंतर केंद्र सरकारने अखेर आज त्यांना पदावरून हटविले आहे.
या प्रसंगी माझ्या समवेत माजीनगरसेविका प्रियाताई गदादे, पर्वती विधानसभा अध्यक्ष संतोष नांगरे, विपुल म्हैसुरकर , मृणालिनीताई वाणी ,किशोर कांबळे आदी पदाधिकारी उपस्थित होते.

 

विश्वासहार्य राजकीय बातम्यांसाठी ज्वाईन करा “सरकार खबर” ग्रुप