पुणे: पोट निवडणुकीत मतदानासाठी महापालिकेतर्फे जनजागृती

पुणे, १२ फेब्रुवारी २०२३: कसबापेठ विधानसभा मतदार संघात २६ फेब्रुवारीरोजी होणाऱ्या पोटनिवडणुकीत जास्तीत जास्त नागरिकांनी मतदानात सहभाग घ्यावा यासाठी जनजागृती फेरी काढण्यात आली होती यामध्ये
नुमवि कनिष्ठ महाविद्यालयाच्या विद्यार्थिनींनी
सहभाग घेतला. शनिवारवाडा येथे कसबा मतदार संघाच्या फोटो बूथ वर नागरिकांनी आवर्जून फोटो काढले.

नुमवि कनिष्ठ महाविद्यालयाच्या विद्यार्थिनींनी शनिवार वाडा परिसरातील नागरिकांना या दिवशी सकाळी ७ ते सायं ६ या वेळेत मतदान करण्याचे आवाहन घोषणांमधून केले. शिरगावकर आणि गायकवाड यांनी चार्ली चॅप्लिन पथनाट्यातून नागरीकांचे मनोरंजनातून प्रबोधन केले. अबाल वृद्धांनी उत्सुकतेने चार्ली बरोबर सेल्फीबूथ वर फोटो काढले.

कसबापेठ विधानसभा मतदार संघाचे
स्वीप नोडल अधिकारी आशिष महाडदळकर, रेवती शाळीग्राम, पूर्वा जोशी, समीर वाळिंबे, गणेश सपार, कल्पेश गायकवाड यांनी कार्यक्रमाचे आयोजन केले.

 

विश्वासहार्य राजकीय बातम्यांसाठी ज्वाईन करा “सरकार खबर” ग्रुप